साऊथच्या कलाकारांना मोठा धक्का नोव्हेंबर पासून होणार नाही सिनेमाचं शूटिंग
गेल्या सहा महिन्यात सिनेमांना अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद (conversation questions) मिळताना दिसत नाहीये. तर ओटीटीमुळंही सिनेमे काही आठवड्यांतच सिनेमागृहातून जातात. एखादा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांतच तो ओटीटीवर येतोय. यामुळं आता सिनेइंडस्ट्री आणि सिनेमा वितरकांचं टेन्शन वाढताना दिसतंय. हे सगळं लक्षात घेत तामिळ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन TFPC द्वारे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.गेल्या काही महिन्यात सिनेमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता तामिळ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशननं सदस्यांसोबत चर्चा केली.
निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असला तरी, कलाकार असो किंवा तंत्रज्ञ , कामगार…या सगळ्यांना मानधन वेळेतच मिळालाय हवं, असं म्हणणं काही सदस्यांनी बैठकीत मांडलं. यावर एकमत झाल्यानं आता TFPCकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळं तामिळ सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांना, चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. येत्या १ नोव्हेंबर पासून एकाही सिनेमाचं शूटिंग होणार नसल्याचं TFPCकडून सांगण्यात आलं आहे
चेन्नई इथं TFPCची बैठक पार पडली. या बैठकीला तामिळनाडू थिएटर ओनर्स असोसिएशन, तामिळनाडू मल्टीप्लेक्स ओनर्स असोसिएशन आणि तामिळनाडू फिल्म डिस्ट्रीब्यूटर्स सह (conversation questions)सिनेइंडस्ट्री संबंधीत अनेक कार्यकारी सदस्य हजर होते. आलेल्या आर्थिक संकाटाला सामोरं जाण्यासाठी काय करता येईल? यावर या बैठकीत चर्चा झाली.या बैठकीत सगळ्यांच्या सहमतीनं एक निर्णय घेण्यात आला की, एखाद्या मोठ्या स्टारचा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असले तर, त्यानंतर आठ आठवडे म्हणजेच दोन महिन्यांनी तो ओटीटीवर प्रदर्शित करावा.तसंच काही कलाकार आणि तंत्रज्ञ एका निर्मिती संस्थेकडून अॅडव्हान्स पेमेंट घेऊन देखील, दुसऱ्या कंपनीसोबत काम करण्यासाठी जातात.
यामुळं निर्मात्यांना तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळं नवीन काम हातात घेण्यापूर्वी कलाकार असो किंवा तंत्रज्ञ यांनी हातातलं जुनं काम पूर्ण करायला हवं. या मुद्द्यावर बोलत असताना धनुषचा उल्लेख करण्यात आला. ज्यानं अनेक निर्मात्यांकडून अॅडव्हान्स पैसे घेतले होते. तसंय या बैठकीत निर्मात्यांनाही आवाहान करण्यात आलं की,एखाद्या मोठ्या कलाकारासोबत काम करताना आधी तामिळ फिल्म निर्माता संघाचा सल्ला नक्की घ्यावा, नवीन सिनेमाची सुरुवात करण्याआधी तामिळ फिल्म निर्माता संघाला याची कल्पना असायला हवी. इतकंच नाही तर ज्या सिनेमांचं शूटिंग सुरू आहे त्यांनी ते ३० ऑक्टोबर आधी पूर्ण करावं. असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
अभिनेते, अभिनेत्रींचं मानधन, तंत्रज्ञ, कामगारांचा (conversation questions)पगार आणि इतर वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी TFPC कडून काही नियम करण्यात येणार आहेत. यासाठी तामिळ इंडस्ट्री पुन्हा नव्यानं काम करणार आहे. त्यामुळं येत्या १ नोव्हेंबर पासून तामिळ सिनेमाचं शूटिंग तसंच इतक सिनेमासंबंधीत कामं बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय बहुमताना या बैठकीत घेण्यात आलाय.
हेही वाचा :
भरधाव ट्रकने वाहनांना १ किलोमीटर फरफटत नेलं, पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू
इचलकरंजीत पुराचे राजकारण: मदतीऐवजी फोटोसेशन वर भर, नागरिकांमध्ये संताप