टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा

टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत टीम इंडियाला 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा घरच्या भूमीवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश होण्याची ही पहिलीच वेळ होती(retirement).

भारताच्या संघाच्या फलंदाजीवर आता सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता भारतीय संघाच्या एका महत्वाच्या खेळाडूबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्ती(retirement) जाहीर केली.

बंगालकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावेळी तो त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी हंगाम खेळत असल्याचे साहाने सांगितले. 2021 मध्ये त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.

माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर साहाकडे काही काळ भारतीय कसोटी संघाचा कायमस्वरूपी यष्टीरक्षक म्हणून पाहिले जात होते. तथापि, त्यानंतर 2021 मध्ये, भारतीय संघ व्यवस्थापनाने साहाला संघातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून केएस भरतची निवड करण्यात आली. मात्र, आता भरतही टीम इंडियाच्या सेटअपमधून जवळपास बाहेर पडला आहे.

आजकाल ध्रुव जुरेलला कसोटी टीम इंडियामध्ये पंतचा बॅकअप म्हणून पाहिले जात आहे. ध्रुव जुरेलला आगामी स्पर्धा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ साठी संघामध्ये स्थान मिळाले आहे. पण त्याला प्लेइंग ११ मध्ये जागा मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण भारतीय संघाचा मुख्य यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला पहिले प्राधान्य दिल जात आहे.

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत पोस्टमध्ये साहाने लिहिले की, “क्रिकेटमधील प्रेमळ प्रवासानंतर हा हंगाम माझा शेवटचा असेल. मी निवृत्तीपूर्वी फक्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना अंतिम वेळी बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचा मला सन्मान मिळाला. या अतुलनीय राईडचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार, तुमच्या पाठिंब्याचा अर्थ जगासाठी आहे. चला हा सीझन लक्षात ठेवण्यासाठी बनवूया”

रिद्धिमान साहाने आपल्या करिअरमध्ये टीम इंडियासाठी 40 कसोटी आणि 09 वनडे खेळले आहेत. कसोटीच्या 56 डावांमध्ये त्याने 29.41 च्या सरासरीने 1353 धावा केल्या ज्यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय साहाने वनडेच्या 5 डावात 41 धावा केल्या.

हेही वाचा :

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..

कोल्हापुरातून देवेंद्र फडणवीस प्रचाराचा फोडणार नारळ

आज विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येणार!