राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्चपासून होणार सुरु; लाडक्या बहिणींना मिळणार मोठी खूशखबर
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप न झाल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. त्यानंतर आता राज्याचे लवकरच अर्थसंकल्पीय(budget) अधिवेशन होणार आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री(budget) अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषक कृषी प्रदर्शनात अजित पवार यांनी उपस्थिती लागली आहे. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या 03 मार्चपासून सुरु होणार आहे. तर राज्याचा नवीन अर्थसंकल्प हा येत्या 10 मार्च रोजी सादर होणार आहे. त्यामुळे आगामी अर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा मांडणार आहे.
हेही वाचा :
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला! जेष्ठ नेते शरद पवारांनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी
तीन अपत्य असतील तर निवडणूक लढवता येणार, ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
भारतासाठी दिलासादायक बातमी; अमेरिकेने तब्बल 20 वर्षानंतर उठवली 3 अणुसंस्थांवरील बंदी