शिक्षकच बनला भक्षक! ३ महिन्यांपासून मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा (Unnatural)फासणारी घटना समोर आली आहे. विद्यालयातील एका नराधम शिक्षकाने निवासी शाळेतील ३ अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला आहे. मागील तीन महिन्यांपासून मुलांवर अत्याचार सुरू होता. ही बाब समोर आल्यानंतर शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली असून, परिसरातून रोष व्यक्त केला जात आहे.

लातूर येथील एका केंद्रीय विद्यालयाच्या विद्यालयात एक संतापजनक प्रकार घडला. शिक्षकानेच ३ मुलांवर अतिप्रसंग केला. सोपान (वय वर्ष ४९) असे नराधम शिक्षक आरोपीचे नाव आहे. मागिल तीन महिन्यांपासून ३ अल्पवयीन मुलांना धमकी देत होता. धमकी देऊन तो मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा.
या घटनेनंतर पीडित तिन्ही मुलांनी मुख्याध्यापकांकडे (Unnatural)धाव घेतली. त्यांच्यासमोर आपबिती सांगितली. मुख्यध्यापिकांनी विद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली. तसेच आरोपी शिक्षकाची चौकशी करण्यात आली. त्यावेळी नराधम शिक्षक सोपान हा दोषी आढळून आला.

शिक्षक दोषी आढळल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच सोपान कळमकर याच्या विरोधात लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार(Unnatural) दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
नमो शेतकरीचे 2000 रुपये जमा, पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी मिळणार? नियमानुसार…
बॉलिवूडमध्ये खळबळ! बलात्कार प्रकरणी ‘या’ दिग्गज डायरेक्टरला अटक
पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी पत्नीला मित्रासोबत….; हादरवणारी घटना