अंगावर काटा आणणारा ‘छोरी २’ चा भयानक ट्रेलर प्रदर्शित

नुसरत भरुचा अभिनीत ‘छोरी 2’ या भयपटाचा(released) ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहेत. या चित्रपटात नुसरतसोबत अभिनेत्री सोहा अली खान महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 11 एप्रिल 2025 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरची सुरुवात एका महिला लहान मुलीला गोष्ट सांगत आहे अशी होते, ती म्हणते, “एक खूप मोठे राज्य होते. त्याचा एक राजा होता. एके दिवशी त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. त्यामुळे राजाला राग आला.” या संवादातून समाजातील मुलींच्या जन्माबद्दल असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाचे चित्रण केले आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये भयावह दृश्यांची मालिका दिसते, ज्यात सोहा अली खानची एंट्री विशेषतः लक्षवेधी दाखवण्यात आली (released)आहे.

‘छोरी 2’ मध्ये नुसरत भरुचा आपल्या बाळाला वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसते, तर सोहा अली खानचा पात्र अधिक रहस्यमय आणि भयानक वाटत आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दृश्यांमुळे चित्रपटाच्या कथानकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. विशेषतः, विहिरीतील महिलांचे दृश्य प्रेक्षकांच्या मनात भीतीदायक भावना निर्माण करतात.

पहिल्या भागाप्रमाणेच, ‘छोरी 2’ देखील अमेझॉन(released) प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे. 11 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांना हा भयपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

हेही वाचा :

सासूचा खून केला, मृतदेह गोणीत भरून निघून गेली; निर्दयी सूनेचा प्रताप

वजन वाढणे, हृदयविकार अन्…; चिकनचा कोणता भाग खाऊ नये?

तुम्ही किती लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं भरसभेत या देशाच्या पंतप्रधानांना विचारण्यात आला प्रश्न

खुल्लम खुल्ला प्यार, कपल भररस्त्यात करत होतं KISS, व्हिडीओ झाला व्हायरल