दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून चोरटा फरार

चोरट्यां उच्छाद दिवसें-दिवस वाढत चालला आहे. मोबाईल, दागिने,(jewelry) रोकड चोरीच्या अनेक घटना समोर येत आहे. अनेकदा या चोरीच्या घटना सीसीटिव्हीमध्ये कैद होतात आणि सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच एका सोनाराच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने भरदिवसा चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान आता अशाच एका सोन्याची चैन चोरणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून चोरटा पळ काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दुचाकीवर बसलेले कुटुंब दिसत आहे. दुचाकीवर दोन मुले आणि एक पुरुष आणि सर्वात शेवटी बसलेली दिसत आहे. महिला दुचाकीवर बसून निघणार तेवढ्यात मागून एक चोरटा दबक्या पावलांनी चालत त्यांच्या जवळ येतो आणि महिलेच्या गळ्यातील चैन हळूच खेचून घेतो. महिलेला काहीतरी खेचल्याचे जावणते त्यामुळे ती झटकन पुढे सरकून गाडीवरून खाली उतरते. तोपर्यंत चोरटा गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढतो. महिला त्याला पकडण्यासाठी मागे धावण्याचा प्रयत्न करते पण तोल जाऊन ती जमिनीवर पडते. काही समजण्याआधी चोरटा पळून जातो. चोरट्याला पकडण्यासाठी महिला जोर-जोरात आरडा करते. दुचाकीवरील माणूस मुलांना खाली उतरवून चोरटा ज्या दिशेला गेला त्या दिशेला दुचाकी घेऊन जातो. महिलेचा आवाज ऐकून जमा झालेले लोकांपैकी एक जण देखील त्याच दिशेने जातो. इतर लोक तिथे बघ्याची भूमिका घेऊन पाहात राहतात. व्हिडीओ पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. सुदैवाने दुचाकी सुरु झाली नव्हती अन्यथा सोन चैन चोरट्यामुळे महिलेचा मोठा अपघात झाला असता.

हेही वाचा :

राम मंदिराचे छत गळत नाहीये, त्यामागे दुसरं कारण

कॅप्टन रोहितने विजयानंतर एकाच शब्दात सांगितलं, म्हणाला..

महाराष्ट्रात गरीब महिलांना दरमहा १२०० ते १५०० रुपये