तरुणींच्या तुफान भांडणाचा थरार: झिंझ्या उपटत जमिनीवर आपटल्या, Video Viral
सोशल मीडियावर(social media) अनेक वागेवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी थरारक स्टंट्सचे व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी हास्याने लोटपोट करणारे व्हिडिओ शेअर केले जातात. तसेच इथे बऱ्याचदा काही असे व्हिडिओ देखील शेअर होतात ज्यातील दृश्ये आपल्याला थक्क करतील.
सध्या देखील इथे असाच एक (social media)व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दोन तरुणींमध्ये तुफान मारामारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता मारामारी म्हटलं की, लोक जमा होणार आणि व्हिडिओ तर बनवले जाणारच अशाच एकाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या कैमरात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आणि आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मारामारी हा एक असा विषय आहे जो लोकांना पाहायला फार आवडतो, म्हणूनच असे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले की ते फार कमी वेळात व्हायरल होतात. लोक मजा घेत असे व्हिडिओज पाहतात आणि शेअर देखील करतात.
सध्या देखील तरुणीमधील एका भयानक मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तरुणी आजूबाजूची पर्वा न करता लोकांच्या घोळक्यात एकमेकींची केस उपटत, एकमेकींना लोळवताना दिसून येत आहे. त्यांची मारामारी पाहून अनेकजण थक्क झाले. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात दोन तरुणी एका सार्वजनिक कार्यक्रमात उच्छाद मांडताना दिसून येत आहे. आता दोन महिला एकमेकींशी भिडल्या म्हणजे राडा हा होणारच आणि लोक जमणारच. या व्हायरल व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले.
व्हिडिओतील दृश्ये बघता समजते की, दोन्ही महिलांची कोणत्या तरी विषयावरून वादावादी झाली असाची आणि नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तरुणी अक्षरशः एकमेकींना धक्काबुक्की करत, केस ओढत यावेळी एकेमेकीनाना मारताना दिसल्या.
तरुणींचे हे भांडण पाहता अनेकजण तेथे जमा झाले आणि मग काहींनी मध्यस्थी करत हे भांडण रोखण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेमकी कुठली आहे, याविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Kalesh b/w Two girls in Crowd during some Fest
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 9, 2025
pic.twitter.com/7hkIgwOOUk
तरुणींमधील हा राडा @Arhantt_pvt नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कॉलेज फेस्टमध्ये दोन तरुणींमध्ये कलेश’ असे लिहिण्यात आले आहे.
व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आजकाल मुलींची भांडण फार वाढली आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नक्कीच, दोन्ही मुली एका मुलासाठी भांडत असाव्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
कोल्हापूरच्या शाहुवाडीत गव्याचा कहर: तरुणावर हल्ला, गंभीर जखमी
ती’ तडफडत राहिली, कोणीही वाचवलं नाही; पुण्यातील आयटी कंपनीचा धक्कादायक VIDEO
“मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा,” सांगलीतील सभेत नितेश राणेंची गर्जना