काळ आला होता पण वेळ नव्हती १ सेकंदाच्या प्रसंगाने बचावला जीव video
अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाने जोर धरला आहे, तर काही (life)ठिकाणी वादळी वाऱ्याने रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला दिसून येतं. दरवर्षी पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात; कुठे अपघात होतो, तर काही गावं पावसाने आणि वादळी वाऱ्याने अगदी उद्ध्वस्त होऊन जातात. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.
अगदी सोसाट्याचा वादळी वारा असला तरी कामानिमित्त घराबाहेर निघणं अनेकदा अनिवार्य होऊन जातं. अशा वेळेस जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेड अलर्ट असल्यास घराबाहेर पडण्यास बंदीच केली जाते, परंतु तरीही काही माणसं हा धोका पत्करून घराबाहेर पडतात आणि जीव गमावून बसतात. पावसात घडणाऱ्या अपघाताच्या घटना काही आपल्यासाठी नवीन नाहीत. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेली गावं तसेच वादळी वाऱ्यामुळे गावं उद्ध्वस्त होऊन जखमी झालेली लोकं अशा बातम्या आपण अनेकदा पाहिल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर असाच एक (life)व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका गावातील रस्त्यावर रहदारी दिसतेय. पावसाचं चिन्ह असून वादळी वारा वाहताना दिसतोय. सोसाट्याचा वारा सुटल्याने अचानक एक छप्पर वाऱ्याच्या वेगाने येऊन एका माणसावर कोसळणार, इतक्यात तो माणूस सावध होतो आणि बाजूला सरकतो. एका सेकंदाच्या सावधगिरीमुळे या गृहस्थाचे प्राण वाचतात, असं म्हणायला हरकत नाही.
वाऱ्याच्या वेगाने कोसळलेलं छप्पर एका दुचाकीवर येऊन कोसळतं. आजूबाजूची माणसं सतर्क होऊन वेळीच तिथून पळ काढतात. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “भावाची नजर खूप तीक्ष्ण आहे म्हणून भाऊ वाचला”, तर दुसऱ्याने लिहिलं, “नशीब भाऊ वाचला, नाहीतर आज काय झालं असतं?”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांना हादरवून टाकलं आहे. अनेकांनी या घटनेवर कमेंट्स करत सावधगिरीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.(life) हे व्हिडीओ अशा घटनांच्या प्रति सतर्क राहण्याची जाणीव निर्माण करतात आणि पावसाळ्यातील आपत्तीपासून कसे सुरक्षित राहावे हे शिकवतात.
ही घटना एकच गोष्ट सांगते, ती म्हणजे सावधगिरी आणि सतर्कता. पावसाळ्यात आणि वादळी वाऱ्याच्या काळात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा: दहा हजार वृक्षारोपणाचे आदेश..
शेतकऱ्यांना दिलासा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची आशा, भारताच्या 6 बॉक्सरवर सर्वांच्या नजरा!