अंबानींच्या लग्नात दिसून आलं बच्चन कुटुंबातील सत्य
भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील(family) सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं राधिका मर्चंटसोबत मोठ्या थाटात लग्न पार पडलं. या शाही सोहळ्यात देश – विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती आणि बॉलिवूड सेलिब्रिटी सामील झाले होते.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंबीय देखील अंबानींच्या शाही लग्नात(family) उपस्थित होते. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेषतः बच्चन कुटुंबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन नंदा, निखील नंदा, नव्या नवेली नंदा, आणि अगस्त्य नंदा दिसत आहेत. मात्र, बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
तरीही, ऐश्वर्या आणि आराध्या देखील अंबानी यांच्या लग्नात उपस्थित होत्या आणि त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघींच्या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबाच्या इतर सदस्यांची अनुपस्थिती असल्यामुळे अनेकांनी विचारणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे, आणि त्यांचे विभक्त राहण्याच्या चर्चाही चाहत्यांमध्ये रंगत आहेत. यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी व्हिडीओमुळे बच्चन कुटुंबात वाद असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. २०११ मध्ये त्यांनी आपल्या मुली आराध्या हिला जन्म दिला. ऐश्वर्या आणि आराध्या अनेक वेळा एकत्र स्पॉट झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
हेही वाचा :
पत्नीच्या हत्येनंतर आत्महत्येचा खोटा बनाव, पतीच्या कटकारस्थानाचा पर्दाफाश
अंबानींची सून राधिका मर्चंटचा पहिला फोटो प्रसिद्ध, गुजराती पाणेतर लेहेंग्यात सजली