लाथा बुक्क्या दगडफेक करत एकमेकींच्या झिंज्या उपटल्या व्हिडिओ व्हायरल

 भिकाऱ्यांच्या दोन गटात प्रचंड हाणामारी झाली आहे. (stones)या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अकोला शहरात भिकाऱ्यांच्या दोन गटात प्रचंड हाणामारी झाली आहे. शहरातल्या टॉवर चौकातील उड्डाणपुलाखाली रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलीये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांचा ठिय्या असतोय‌. या दोन्ही गटात एका अज्ञात कारणावरून हाणामारीला सुरुवात झालीय. यात दोन्ही गटांनी एकमेकांना दगडाने मारहाण केलीये.

या घटनेत दोन्ही गटातील जवळपास पाच पुरुष आणि महिला जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झालेत. या संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ ‘साम’च्या हाती लागलाय. यात दोन्ही गटातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र, वादाचं मुळ कारण अद्याप समोर आलेलं नाही.राज्यात भीक मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकच काय तर यात लहान मुले, बायकांची संख्या मोठी आहे. अकोल्यातील भीक मागणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोल्यातल्या टावर चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि आसपास परिसरात भीक मागणाऱ्यांचं मोठ वास्तव आहे.

टावर चौकातल्या उड्डाणपुलाखाली भीक (stones)मागणाऱ्यांची कुटूंब राहत आहेत. 15 ते 20 कुटुंब आणि चिमुकले मुलेही येथे राहत आहेत. आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास या भीक मागणाऱ्यांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. हा वाद चांगलाच विकोपाला गेला. बघता बघता यातील काही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीचे रूपांतर दगडफेकीत झाले. यात काही महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. पुरुष महिलांना मारहाण करत असल्याच पाहत स्थानिक रस्त्यावरील नागरिकांनी तेथे धाव घेत मध्यस्थी केली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

या वादादरम्यान चिमुकल्यांचा टाहो सुरु होता. अक्षरशः भीक मागणाऱ्या महिलांना सोबतच्या कुटुंबातील पुरुषांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दगडाने मारहाण करण्यात (stones)आली. यातील एका महिलेला तोंडावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यानंतर जखमी महिलांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मारहाणीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

हेही वाचा:

विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा: “माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई”

वजन वाढवण्याची भीती न करता पांढरे लोणी खा: याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

शक्तिपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा सुरुवात