पत्नीने आधी दारु पाजली, नंतर पतीला संपवलं; अंत्यसंस्कारावेळी उघड झाला हत्येचा प्रकार

ग्वालियर : पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी तिने पतीला दारु पाजली, त्यानंतर मासे फ्राय करुन खायला दिले आणि नंतर पतीचा गळा दाबून त्याची हत्या(death) केली. आपल्या प्रियकरासाठी तिने पतीची निर्दयी हत्या केली.

मृत लोकेंद्र यांचा मृत्यू (death)झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. त्यावेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काही लोकांना लोकेंद्र यांच्या गळ्यावर काही खरचटलेले डाग दिसले. ते पाहून लोकांना संशय आला आणि याबाबत पोलिसांत माहिती देण्यात आली.

लोकेंद्र यांच्यावरील अंत्यसंस्कार थांबण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या अहवालात लोकेंद्र यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. अंजलीने नातेवाईकांना लोकेंद्रने काही खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. मात्र गळ्यावरील निशाण पाहून संशय आला आणि तिचा गुन्हा समोर आला.

लोकेंद्र यांचा मृत्यू होण्याच्या काही वेळ आधीच त्यांची पत्नी अंजली कुशवाहा आणि तिचा मावस भाऊ घरात आले होते. त्याआधी ज्यावेळी लोकेंद्र यांचा मृतदेह मिळाला त्यावेळी दोघं घरातून बेपत्ता झाले होते. त्यामुळे पोलिसांना अंजलीवर संशय होता. ज्यावेळी अंजलीला पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली त्यावेळी तिने गुन्हा कबूल केला.

अंजलीचे तिचा प्रियकर गौरवसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती अंजलीच्या पतीला लोकेंद्रला मिळाली होती. त्यानंतर लोकेंद्रने गौरव याला त्यांच्या घरी येण्यास मनाई केली होती. त्यामुळेच अंजलीने गौरव आणि तिच्या मावस भावासोबत हत्येचा कट रचला. त्याआधी गौरववर हत्येचा संशय येऊ नये यासाठी हत्येच्या १५ दिवस आधी गौरवला नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर पाठवण्यात आलं होतं.

१८ सप्टेंबरच्या रात्री अंजलीने तिच्या मावस भावाला घरी बोलावलं. अंजलीने लोकेंद्रला दारू(drank) पाजली. नंतर मच्छी खायला घातली. तो नशेत असल्याचं समजल्यानंतर तिच्या मावस भावाने लोकेंद्रचे हात पकडले आणि अंजलीने त्याच्या छातीवर बसून त्याची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंजली, तिचा भाऊ बेटू याच्यासह अंजलीच्या प्रियकराला गौरवला अटक केली आहे.

हेही वाचा:

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार?

Finally घटस्पोटांच्या अफवांवर ऐश्वर्या रायचा खुलासा, व्हिडीओ होतोय व्हायरल

महिलांसाठी मद्यपान करणं किती सुरक्षित आहे? मद्यपान करण्यात स्त्रियाही अव्वल