कार्यकर्त्यांचा अतिउत्साह अंगलट, फटाक्यांची ठिणगी उमेदवाराच्या केसावर पडली अन्..

राज्यातील निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. येत्या 20 नोव्हेंबररोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत आहे. तर 23 नोव्हेंबररोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. अशातच कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे प्रचाराच्या रॅलीदरम्यान उमेदवारासोबत(candidate) विचित्र प्रकार घडला आहे.

कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवाराच्या(candidate) जीवाशी बेतले आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दाखवलेला अतिउत्साह राकेश मुथा यांना चांगलाच भारी पडलाय.

राकेश मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. यावेळी इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाकेदेखील लावण्यात आले. त्याचवेळी फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर पडली.

फटाक्याच्या ठिणगीमुळे राकेश मुथा यांच्या केसांनी लगेच पेट घेतला. यानंतर कार्यकर्त्यांनी लगेच ही आग विझवली.त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची टळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचार करण्यात हा दाखवलेला अतिउत्साह उमेदवाराला चांगलाच भारी पडल्याचं यातून दिसून आलं.

हेही वाचा :

काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता

निवडणूक आयोगाने नाकारली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात

दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाच्या हाती लागणार? ऋषभ पंतची जागा कोण घेणार?