शिरोली औद्योगिक वसाहतीत चोरीची घटना; तब्बल 20 लाख 36 हजारांचा मुद्देमाल लंपास
शिरोली : शिरोली औद्योगिक वसाहतीतील(industrial estate) स्पेअर पार्ट दुकानाच्या लोखंडी दरवाज्याच्या पट्ट्या कापून 20 लाख 36 हजार 284 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या एकाच दुकानाची अवघ्या दोन महिन्यांतील दुसरी चोरीची घटना घडली आहे.
ऑगस्ट महिन्यात साठ लाखांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने भिंत फोडून लंपास केला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर मशिन स्मॅक आयटीआय(industrial estate) कार्यालयाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून प्राचार्यांच्या रुममधून चोरुन नेले. स्मॅक येथील घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई व डीवायएसपी सुजितकुमार क्षीरसागर यांनी बुधवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी दुकानाची पाहणी केली. तसेच तपासाबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनील गायकवाड यांना सूचना व मार्गदर्शन केले.
याबाबतची फिर्याद सागर पंडितराव निकम (वय ३९, रा. कवडे गल्ली, कसबा बावडा) यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत घटनास्थळ व शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (स्मॅक) संस्थेच्या आयटीआयच्या इमारतीमध्ये शॉप नंबर एकमध्ये सागर निकम यांचे नेक्सस कटिंग सोल्यूशन डिस्ट्रिब्युशन नावाचे दुकान आहे. या दुकानातून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सीएनसी, व्हीएमसी, एचएमसी व अन्य मशिनला लागणारे स्पेअर पार्ट्स पुरवले जातात.
रविवारी सायंकाळी सहा वाजता सागर निकम हे दीपावली सणानिमित्त दुकानात पुजा करुन दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी औद्योगिक वसाहतीला सुट्टी असल्यामुळे दुकान बंद होते. पण आयटीआय सुरू होते. सोमवारी दिवसभरात या दुकानाचा दरवाजा सुस्थितीत होता. पण ही चोरीची घटना घडली.
मंगळवारी सागर निकम हे दुकान उघडण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता आले. निकम हे दरवाजाचे कुलूप काढण्यासाठी आले असता दरवाज्याच्या लोखंडी पट्ट्या कापून दुकानातील कपाटे उचकटून चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
निकम यांनी या घटनेची माहिती शिरोली पोलिसांना कळवली. सुनील गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व श्वानपथक पाचारण केले. हे श्वान दुकानाच्या दारातच घुटमळत राहिले. त्यानंतर फाॅरेन्सीक लॅब पथकाला बोलावून हात व पायाचे ठसे घेण्यात आले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी तिजोरी व कपाट उचकटून दुकानातील सुमारे एकवीस लाख रुपयांच्या वस्तूंची (पार्ट्स) चोरी झाली असल्याचे निकम यांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा :
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याची आत्महत्या? वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोन्याने दिली आनंदवार्ता! लग्न सराईपूर्वीच उतरले भाव
CM शिंदेंना धक्का! एक दोन नव्हे आठ नेत्यांचा जय महाराष्ट्र; ठाकरे गटात प्रवेश