…तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित…!
सर्व भारतीय क्रिकेट प्रेमींच्या नजरा सध्या टीम इंडियाच्या वर्ल्डकप (cricket india)जिंकण्याकडे आहेत. आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवण्यास सेमीफायनलचं तिकीट पक्कं होणार आहे. टीम इंडियाची विजयी घौडदौद सध्या सुरु आहे. भारत आज सुपर 8 मधील शेवटचा सामना खेळण्यास मैदानावर उतणार आहे. मात्र त्यापूर्वी असं समीकरण बनतंय ज्यामुळे टीम इंडियाची थेट फायनलमध्ये एन्ट्री होणार आहे.
टी-20 वर्ल्डकप(cricket india) सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे. ऑस्ट्रेलियाला हरवून अफगाणिस्तानने टीम इंडियाचं काम अधिक सोपं केलं आहे. यामध्ये पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भारत आता थेट फायनल खेळणार, असे समीकरण तयार होताना दिसतंय.
टीम इंडियाने आतापर्यंत चांगला खेळ केला असून उत्तम रन रेटसह भारत ग्रुप एच्या अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना गमावला तरीही टीम अव्वल स्थानावर राहणार आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीम आहेत. आफ्रिकेची टीम यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. जर टीम इंडियाने ग्रुप-1 मध्ये अव्वल स्थान पटकावलं तर भारतीय संघ 27 जून रोजी सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे. मात्र या सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं समोर आलं आहे.
T20 वर्ल्डकप 2024 मध्ये, ICC ने पहिल्या सेमीफायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवला आहे. मात्र परंतु दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस नाही. जर टीम इंडियाने पहिलं स्थान पटकावलं तर 27 जून रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. मात्र Accuweather नुसार, या दिवशी पाऊस पडण्याची जवळपास 90 टक्के शक्यता आहे. मात्र, या सामन्यासाठी तब्बल 4 तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर सामना रद्द झाला तर सुपर-8 च्या ग्रुपमध्ये अव्वल असणारी टीम थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे.
हेही वाचा :
‘शक्तिपीठ’ महामार्गावरुन कोल्हापूर तापलं, CM शिंदेंनी दौऱ्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
टीम इंडियाकडून खेळलेला महाराष्ट्राचा क्रिकेटपटू उतरणार राजकारणात
मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केला, आंदोलकांनी तोंडाला फासलं काळं Video