विधानपरिषद निवडणुकीत मोठा घोडेबाजार, ‘मविआ’चे अनेक आमदार फुटल्याची चर्चा
विधानपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून सकाळी नऊ वाजल्यापासूनच(legislative) आमदार विधानसभेमध्ये येऊन 11 जागांसाठीचा मतदानाचा हक्क पार पाडताना दिसत आहेत. या निवडणुकीमधील 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने नेमका पराभव कोणाचा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. असं असतानाच आता एका आमदाराने थेट आमचे 3 ते 4 आमदार फुटतील असा दावा केला आहे.
विशेष म्हणजेच याच दृष्टीने आम्ही नियोजन केलं असल्याचंही या आमदाराने(legislative) जाहीरपणे सांगितलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पक्षाला ही निवडणूक सर्वात सोपी जाईल असं सांगितलं जात आहे त्याच पक्षातील आमदाराने हा दावा केला आहे. हे चार आमदार कोण आहेत याबद्दल सूचक संकेतही या आमदाराने दिलेत.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेली निवडणूक चुरशीची ठरणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार रिंगणात आहेत.
तर शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे 2 उमेदवार ही निवडणूक लढत असून काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सावत, शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील असे एकूण 12 उमेदवारांचं नशीब मतपेटीमध्ये कैद होणार आहे.
एकूणच काँग्रेसचे तब्बल ८ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी की महायुती? नेमका कुणाचा उमेदवार पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
निवडणुकीत भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीने ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे स्वतःचे ४० आमदार, दोन अपक्ष आमदार, असे एकूण ४२ मते आहेत.
त्यातच काँग्रेसच्या जर ४ आमदारांनी त्यांना मतदान केलं तर त्यांच्याकडे ४६ मतं असू शकतील. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार फर्स्ट प्रेफरन्समध्येच निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा होती.
मात्र, शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवून ही निवडणूक चुरशीची केली. मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाला जवळपास ७ ते ८ मतांची आवश्यकता आहे.
हेही वाचा :
अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारचं गिफ्ट…
खुशखबर! सोन्या-चांदीच्या भावात आली स्वस्ताई
ना साडेसाती, ना वक्री चाल! ‘या’ राशीचे लोक अल्पावधीतच होतात मालामाल