सांगली रिक्षा नुतनीकरणास प्रतिदिन ५० रुपये विलंब आकारणीच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने

वार्षिक नूतनीकरणाच्या नावाखाली विलंब शुल्कापोटी प्रतिदिन लावण्यात येणारा पन्नास (rupees)रुपये कराच्या विरोधात शनिवारी सायंकाळी उबाठा शिवसेनेच्यावतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली.

रिक्षाचालक व हलके वाहनधारक यांच्यावर केंद्र सरकारने वार्षिक नूतनीकरणाच्या निर्धारित वेळेनंतर उशिरा होणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी पन्नास रुपये कर लावण्यात आला आहे. हा कर चुकीच्या पद्धतीने वसूल केला जाणार आहे. त्याच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर, शहरप्रमुख विराज बुटाले यांनी केले. रिक्षावाल्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाईसाठीसुद्धा रिक्षावाल्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहील, असे विभुते यांनी यावेळी सांगितले. यावेळी ऑटो रिक्षा युनियन अध्यक्ष बालम मुजावर विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायत संघटनेचे राजू रसाळ, महेश चौगुले, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

विमानात असते एक सिक्रेट रुम, कधीच दिसत नाही,कशासाठी असते ही रुम?

पहिल्यांदाच खासदार झाल्यावर मंत्रिपदी वर्णी कशी लागली?, मुरलीधर मोहोळ !

जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी बाप, लेकाची अशीही मैत्री.