निधीवाटपातही शिंदेंसोबत दुजाभाव, भाजप, राष्ट्रवादीला जास्त तर शिवसेनेला कमी

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार(politics) यांनी अर्थसंकल्प सादर केला असून, त्यानंतर महायुतीतील निधीवाटपाचे समीकरण चर्चेत आले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना तुलनेने अधिक निधी मिळाल्याचे दिसत असले तरी, शिवसेना (शिंदे गट) ला कमी वाटप झाल्याने नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी नगरविकास विभागाला ६८,६०१.२० कोटी रुपये मिळाले होते, मात्र यंदा हा निधी तब्बल १०,३७९.७३ कोटी रुपयांनी घटवण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(politics) यांच्या गटात नाराजीचा सुरु उमटण्याची शक्यता आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सतत रंगत होत्या. आता अर्थसंकल्पीय वाटपातही भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी शिंदे गटावर वर्चस्व गाजवल्याचे बोलले जात आहे. नगरविकास खात्यातील तब्बल १० हजार कोटींची कपात झाल्याने शिंदे गट पुन्हा नाराज होईल, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
या अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांना १ लाख कोटींचा निधी तर शिवसेना (शिंदे गट) च्या मंत्र्यांना ८७ हजार कोटींचा निधी मिळाला आहे. राष्ट्रवादीकडे अर्थखाते असल्यामुळे अजित पवार गटाला तुलनेने अधिक निधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असल्याने या विभागासाठी १,८४,२८६.६४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थ विभागाला २,४७,५७० कोटी रुपयांची वाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाचा १० हजार कोटींचा निधी कमी करण्यात आला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागासाठी सर्वाधिक ४४,५०६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
महायुतीचा अर्थसंकल्प लोकप्रिय योजनांना कात्री
… म्हणून ‘तारक मेहता..’ फेम बबिताजीने अद्याप लग्न केलं नाही; कारण वाचून थक्क व्हाल!