‘नीट-यूजी’ परीक्षा व्यवस्थेत खिंडार नाही; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

‘नीट-यूजी’ परीक्षेसंदर्भातील पेपरफुट (exam)प्रकरणावरून सुरू असलेल्या वाद आणि विद्यार्थ्यांच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २३ जुलै रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे की, ‘नीट-यूजी’ परीक्षा व्यवस्थेत कोणताही खिंडार आढळला नाही, त्यामुळे पेपरफुटीच्या चिंतेमुळे परीक्षा रद्द केली जाणार नाही.

हजारीबाग आणि पाटणामधील प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांनंतर, सीबीआयच्या अहवालानुसार, या केंद्रातून निवडलेले १५५ विद्यार्थी फसवणुकीतून लाभार्थी झाले असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचे खंडपीठाने या मुद्द्यावर निरीक्षण नोंदवले आणि परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेमुळे मोठा परिणाम झालेला नाही, असे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे, ‘नीट-यूजी-२०२४’ परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला उत्तर देताना न्यायालयाने स्थिरता आणि पारदर्शकतेचा निर्देश दिला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे कोणत्याही अनिश्चिततेच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही, असे मानले जात आहे.

हेही वाचा:

“लाडक्या बहिणी कपटी आणि सावत्र भावाला धडा शिकवतील”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्ला

डेंग्यूचा ताप की पावसाळ्यातील ताप? कसा ओळखावा फरक, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

टीम इंडिया ; जिंकता जिंकता सामना झाला टाय, शिवम दुबेचा एलबीडब्ल्यू ठरला वादग्रस्त