“माझा भांग वाकडा करू शकेल, असा कुणी पृथ्वीवर नाही”; भाजप खासदाराचं वक्तव्य

भाजपचे खासदार धनंजय महाडिक(political news) यांनी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केले होते. योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, असं महाडिक म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. महिलांना धमकी दिली तर मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

त्यानंतर खासदार धनंजय महाडिक(political news) यांनीही “माझा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर नाही”, असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. आता महाडिक यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांनी त्यांना टोला लगावलाय. आता सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात शाब्दिक वार सुरू झालं आहे.

“मी त्यांना सांगू इच्छितो की, 2 लाख 70 हजार मतांनी तुमचा भांग विस्कटण्याचं काम या कोल्हापूरच्या जनतेने केलं आहे”, असा टोला सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना लगावला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आता जुंपली आहे.

भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिला आढळल्यास त्यांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो अशा शब्दात त्यांनी जाहीर धमकी दिली होती. यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. धमकी देतोस की काय? मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरच धनंजय महाडिक प्रत्युत्तर देताना म्हणाले होते की, “उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो, मला तुमचा अवमान करायचा नाही, पण मुन्ना महाडिकाचा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही, असा कोण पृथ्वीवर जन्माला आलेला नाही.” यानंतर महाडिक यांच्या याच विधानावर सतेज पाटील यांनी 2 लाख 70 हजार मतांनी तुमचा भांग विस्कटण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलंय, असं म्हणत टोला लगावला.

हेही वाचा :

आज अनेक शुभ योग; ‘या’ राशींचं नशीब फळफळणार, होणार मोठा धनलाभ

कार्यकर्त्यांचा अतिउत्साह अंगलट, फटाक्यांची ठिणगी उमेदवाराच्या केसावर पडली अन्..

काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता