शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात(politics) सुरु आहे. आयोध्यातील राम मंदिराच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीबाबत देण्यात आलेल्या नाशिकमधील जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटातील गटबाजी उघड झाली आहे.
नाशिकमधील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना वर्षपूर्तीच्या निमित्ताने आज शिवसेना शिंदे(politics) गटाकडून काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याच संदर्भात देण्यात आलेल्या जाहिरातीत शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे इतर सर्व महत्वाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे नाव असताना अजय बोरस्ते यांचे नाव मात्र वगळल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आणि उपनेते अजय बोरस्ते यांच्यांत गेल्या काही दिवसापासून सुप्त संघर्ष सुरु असल्याची पक्षात चर्चा आहे. त्यानंतर आता काळाराम मंदिरातील महाआरतीच्या आयोजन जाहीरातीमध्ये अजय बोरस्ते यांचं नाव न टाकल्याने नाशिकमध्ये शिंदे गटात दोन गट पडल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी दादा भुसे यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. दादा भुसे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे. नाशिकसाठी लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळेल. सब्र का फल मिठा होता है…मंत्री दादा भुसे यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असं अजय बोरस्ते यांनी सांगितले.
मुख्यमंत्री दावोसवरून परत आल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. काल ठाण्यात कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शिंदेंनी कार्यकर्त्यांना ग्वाही दिली. तसेच देवेंद्र फडणवीस दावोसहून परत आल्यानंतर त्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
अरविंद केजरीवालांची भाजपवर टीका; म्हणाले, “कमळाचे बटण दाबले की घरी…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोक्यात नक्की काय?, म्हणाले नवीन रुग्ण मिळाला की ऑपरेशन…
गूढ आजाराची एन्ट्री! 17 जणांचा मृत्यू, अख्खं गाव कँटोनमेंट झोन घोषित