टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठा बदल

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची(Team India) टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. ग्वालीयर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. आता बुधवार 9 ऑक्टोबर दिल्ली येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टी 20 सामना पार पडणार असून यात टीम इंडिया बांगलादेशला पुन्हा धोबीपछाड देणार की बांगलादेश भारताला हरवून कमबॅक करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टी 20 सामना(Team India) पार पडेल. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मोठा विजय मिळवून 11.5 ओव्हरमध्ये 128 धावांचे आव्हान पूर्ण केले.

यात फलंदाजांमध्ये हार्दिक पंड्याने 39 धावांची दमदार खेळी केली तर अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया या सामन्यात बांगलादेशला ऑल आउट करून टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विरोधी टीमला सर्वाधिक 42 वेळा ऑलआउट करण्याचा रेकॉर्ड केला.

दिल्लीमध्ये बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. यात टीम इंडियाकडून अजून एक फास्ट बॉलर डेब्यू करू शकतो. रविवारी झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात वेगवान गोलंदाज मयंक यादव याने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता दिल्ली येथील सामन्यात सूर्यकुमार यादव आणि गंभीर अजून एका ‘लोकल बॉय’ ला संधी देऊ शकतात.

वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा भारताकडून पदार्पण करू शकतो. हर्षित राणा याने आयपीएलमध्ये केकेआर विरुद्ध खेळताना गोलंदाजीत उत्तम प्रदर्शन केले. जर दिल्ली हे हर्षित राणाचं होम ग्राउंड आहे. हर्षितला संधी दिली तर नीतीश कुमार रेड्डीला बेंचवर बसावे लागू शकते. त्याने देखील भारतासाठी एकच सामना खेळला आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 सीरिजच्या सर्व सामन्यांचा लाईव्ह टेलिकास्ट Sports18 Network या टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात येईल. तर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा अँप तसेच वेबसाईटवर पाहू शकता. टी 20 सीरिजचे सामने तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर फ्रीमध्ये पाहू शकता. मात्र ही सुविधा केवळ डीडी फ्री डिश आणि अन्य DTT उपभोक्त्यांसाठीच उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 सामना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाणार नाही जो केबल टीव्ही किंवा डीटीएच प्लॅटफॉर्म जसे की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्लेवर प्रसारित केला जाईल. तसेच तुम्ही भारत विरुद्ध बांगलादेश पहिला सामना हा स्पोर्ट्स 18 च्या चॅनेलवर तसेच जिओ सिनेमावर सुद्धा पाहू शकता.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, मयंक यादव.

हेही वाचा :

रांझन’ गाण्यात शाहीर शेख आणि क्रिती सेनॉनची धमाकेदार केमिस्ट्री

मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार

राज्यात खळबळ! ‘या’ माजी आमदारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या