हवामानात मोठा बदल होणार, IMD ने दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला असून, गुरुवारी (१७ जानेवारी) बहुतांश भागात किमान तापमानात(weather) वाढ झाल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत थंडी कमी झाली असून, किमान तापमान हळूहळू वाढत आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे.
आज (१७ जानेवारी) पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके राहिल. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर ढगाळ वातावरण असेल. कमाल तापमानात(weather) देखील वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
साताऱ्यामध्ये आज निरभ्र आकाश असणार आहे. साताऱ्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात हलकी थंडी जाणवण्याची शक्यता असून पुढील दोन दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कमी होताना दिसत आहे. किमान तापमानात आता २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होताना दिसत आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी! ‘या’ तारखेअगोदर मिळणार जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे
एसटीच्या चालक आणि वाहकांसाठी गुडन्यूज, महामंडळानं केली सर्वात मोठी घोषणा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ