लवकरच होणार सूर्य-शनीची अद्भूत युती; ‘या’ 3 राशींना लागणार लॉटरी, होणार पगारवाढ

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी(zodiac signs) तसेच, स्थिती परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा अनेकदा युती योग निर्माण होतो. ग्रहांच्या या अद्भूत योगाचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनी कुंभ राशीतून(zodiac signs) निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी सूर्यग्रहण देखील लागणार आहे. यामुळे सूर्य-शनीची युती निर्माण झाली आहे. सूर्य-शनीच्या युतीचा कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेऊयात.

मिथुन रास
शनीचं संक्रमण आणि सूर्य ग्रहणाची अद्भूत युती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची तब्येत देखील चांगली असेल. तुम्ही आर्थिक स्थिती मजबूत असेल. मात्र, तु्म्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. विनाकारण पैसे खर्च करु नका. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल.

धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी हा अद्भूत युतीचा काळ फार लाभदायक ठरेल. या काळात तुमची धार्मिक कार्यात रुची वाढलेली दिसेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली ऑफर मिळेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, आरोग्य देखील उत्तम असेल.

मकर रास
शनीच्या संक्रमणाचा आणि सूर्य ग्रहणाचा मकर राशीवर शुभ परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तुमचे नातेसंबंध घट्ट होतील. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन

गजराजाशी मस्ती मगरीला पडली महागात, सोंडेला पकडताच असे केले… Video Viral

चेन्नईत एड शीरनच्या कॉन्सर्टमध्ये ए. आर. रहमानचा जलवा, ‘उर्वशी-उर्वशी’ने रंगला माहोल!