या ७ कारणांमुळे फोन होतो गरम, चुकूनही करु नका या चुका

झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण दिवसभर फोन(phone) चाळत बसतो. प्रवासाचा सोबती म्हणून याचा उपयोग आपल्याला अधिक होतो. हल्ली मोबाईल स्फोटच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या आहेत.

मोबाईलचे(phone) नवनवीन प्रकारही पाहायला मिळतात. त्यात अनेक नवे फीचर्सही आहेत. ज्यामुळे हा फोन अॅडव्हान्स होत आहे. यामध्ये डेटा प्रोसेसिंगची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे.

परंतु, अनेकदा फोन नवीन घेतल्यानंतरही तो गरम होतो. अशी युजर्सची तक्रार असते. फोन चार्जिंगला लावला की, तो गरम होतो. हल्ली स्मार्टफोन गरम होण्याची कारणे अनेक आहेत. स्मार्टफोन जितका जुना तितका गरम होण्याच्या समस्या जास्त असतात. पण जर तुमचा नवीन स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर या चुका करणे टाळा.

-स्मार्टफोन गरम होण्यासाठी वातावरण महत्त्वाची भूमिका बजावते. जर अधिक उष्णता असेल तर फोन गरम होतो.

-चार्जिंग करताना तुम्ही फोन सतत वापरत असाल तर त्याचा बॅटरीवर जास्त दबाव पडतो. हा फोन खूप वेगाने गरम होतो. फोन चार्जिंगला लावलेला असताना फोन वापरु नका.

-बरेचदा स्मार्टफोनच्या मागच्या कव्हरमधून बाहेर पडणारी उष्णता रोखली जाते. ज्यामुळे फोन वापरताना तो गरम होऊ लागतो.

-स्मार्टफोनची बॅटरी खराब झाल्यावरही फोन गरम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फोन सतत गरम होत असेल तर बॅटरी तपासा.

-अनेक वेळा कमी प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोन गेमिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग यांसारखे कामे केल्यामुळे स्मार्टफोन गरम होऊ लागतो.

-स्मार्टफोनवर कोणतेही काम करत असाल किंवा कॉल करत असाल किंवा बँकग्राउंडमध्ये अनेक अॅप्स उघडले तर फोन गरम होऊ लागतो.

-जर तुमचा फोन खूप जुना झाला असेल आणि कोणतेच अपडेट मिळणे बंद झाले असेल तर त्यामुळेही स्मार्टफोन गरम होऊ लागतो.

हेही वाचा :

सभा PM मोदींची अन् फोटो झळकले राहुल गांधींचे; उलटसुलट चर्चांना उधाण

मतदानाचा हक्क बजावून, नवा विक्रम निर्माण करा; PM मोदींचं नागरिकांना आवाहन

अनुभवच सर्वकाही! शेवटच्या ओव्हरमध्ये रोहितने सूत्र हातात घेतली आणि….; संपूर्ण गेमच पलटला