यंदाच्या शारदीय नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत 9 रंग
हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री(Navratri) महोत्सव. देशभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा, गरबा, कन्यापूजा, जागरता आदी नऊ दिवस केले जातात.
यावर्षी नवरात्रीचा(Navratri) उत्सव हा 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी देशभरात जय्यत तयारी केली जात आहे. अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री असे देखील म्हटले जाते. या नऊ दिवसांत महिला नऊ रंगाचे वस्त्र परिधान करतात. नऊ दिवसांत नऊ रंगाचे देखील महत्व आहे. यंदा या 9 दिवसांत कोणकोणते रंग असणार ते पाहुयात.
नवरात्रीचे 9 रंग तारखांसह जाणून घ्या-
पहिला दिवस (3 ऑक्टोबर 2024)- पिवळा रंग
दूसरा दिवस (4 ऑक्टोबर) – हिरवा रंग
तिसरा दिवस (5 ऑक्टोबर)- राखाडी रंग
चौथा दिवस (6 ऑक्टोबर)- नारंगी रंग
पाचवा दिवस (7 ऑक्टोबर)- पांढरा रंग
सहावा दिवस (8 ऑक्टोबर) – लाल रंग
सातवा दिवस (9 ऑक्टोबर)- निळा रंग
आठवा दिवस (10 ऑक्टोबर)- गुलाबी रंग
नववा दिवस (11 ऑक्टोबर)- जांभळा रंग
पूजा कोणत्या दिवशी होणार?
3 ऑक्टोबर, गुरुवार – माता शैलपुत्रीची पूजा
4 ऑक्टोबर शुक्रवार – ब्रह्मचारिणी मातेची पूजा.
5 ऑक्टोबर शनिवार – चंद्रघंटा मातेची पूजा
6 ऑक्टोबर रविवार – कुष्मांडा मातेचे पूजन
7 ऑक्टोबर सोमवार – आई स्कंदमातेची पूजा
8 ऑक्टोबर मंगळवार – कात्यायनी मातेची पूजा
9 ऑक्टोबर बुधवार – माँ कालरात्रीची पूजा
10 ऑक्टोबर गुरुवार – सिद्धिदात्री मातेची पूजा
11 ऑक्टोबर शुक्रवार – महागौरी मातेची पूजा
12 ऑक्टोबर शनिवार – विजयादशमी (दसरा)
महाराष्ट्रातही माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. नवरात्रीच्या काळात या ठिकाणी नऊ दिवस यात्रा भरत असते. या काळात भाविक मोठ्या संख्येने भेटी देतात.
हेही वाचा :
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार?
आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?
“गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहीणींना फक्त 1500 रुपये?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल