१ ऑक्टोबरपासून होणार ‘हे’ पाच बदल; तुमच्या घरावर होणार इफेक्ट

सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. मंगळवारपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात देशात काही मोठे बदल पाहण्यास मिळतील. या बदलांचा परिणाम तुमच्या घरावरही(gas) होणार आहे.

यामध्ये एलपीजी गॅसच्या(gas) किंमती, क्रेडिट कार्ड, सुकन्या समृद्धी आणि पीपीएफ खात्याशी संबंधित नियमांत बदल यांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊ या ऑक्टोबर महिन्यात काय बदल होणार आहेत.

LPG गॅसच्या किंमती
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला गॅसच्या किंमतीत काही बदल करत असतात. त्यामुळे मंगळवारी (1 ऑक्टोबर) सकाळी सहा वाजता एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झालेला दिसू शकतो. मागील काही दिवसांपासून 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या दरात बदल होताना दिसत आहेत. घरगुती गॅसच्या दरात मात्र बदल झालेले नाहीत. सप्टेंबर महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ झाली होती. घरगुती गॅसचे दर आहे तेच राहिले होते. आता दिवाळीआधी घरगुती गॅसचे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ATF आणि CNG-PNG रेट
देशभरात महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एअर टर्बाइन फ्यूल (विमानाचे इंधन) आणि सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल करत असतात. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या इंधनाच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात एटीएफच्या किंमतीत कपात झाली होती.

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड
जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. काही क्रेडिट कार्ड्सचा लॉयल्टी प्रोग्राम बदलला आहे. नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. यानुसार एचडीएफसी बँकेने स्मार्टबाय प्लॅटफॉर्मवर अॅपल प्रॉडक्ट्ससाठी रिवार्ड पॉइंटच्या रिडम्पशनला एक प्रॉडक्ट प्रत्येक तिमाही असे धोरण निश्चित केले आहे.

सुकन्या समृद्धी योजना नियमात बदल
केंद्र सरकारमार्फत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेशी संबंधित नियमात मोठा बदल झाला असून हा बदल येत्या मंगळवारपासून लागू होणार आहे. या बदलानुसार मुलींचे कायदेशीर पालकच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते संचालित करू शकतील. या योजनेत मुलीच्या कायदेशीर पालक नसलेल्या एखाद्या व्यक्तीने मुलीच्या नावे खाते उघडले असेल तर अशा परिस्थितीत ते खाते मुलीच्या नैसर्गिक पालकांना हस्तांतरीत केले जाईल. जर असे शक्य नसेल तर खाते बंद होऊ शकेल.

हेही वाचा:

‘धर्मापासून लांब राहणं योग्य…’, ‘आदिपुरुष’ वादावर सैफनं सोडलं मौन

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी