मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत म्हशीने असे काही केले की… पाहूनच आवाक् व्हाल; Video Viral
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-106.png)
आजकाल सोशल मीडिया ही अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इथे नेहमीच लोक अनेक गोष्टी शेअर करत असतात ज्या बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. आता तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही या व्हायरल(viral) गोष्टी इथे नक्कीच पाहिल्या असतील.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-101-1024x1024.png)
इथे अनेक थरारक घटना, हास्यास्पद व्हिडिओ तर काही प्राण्यांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. इथे कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल(viral) होतो तर कधी जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या मात्र इथे एक अनोखी घटना व्हायरल झाली आहे जी पाहून तुम्ही व्यक्तीच्या नशिबावर हळहळ व्यक्त कराल.
असे अनेकदा घडते की आपण चांगल्या मानाने काही करायला जातो पण घडते काही वेगळेच. अनेकदा असेही होते की दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करताना मात्र आपल्यासोबतच काहीतरी वाईट घडून बसते. अशात बरेचजण आपल्या नशिबाला दोष देतात. या व्हायरल व्हिडिओतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. जिथे एक व्यक्ती बैलाच्या चांगल्यासाठी तिची मदत करू पाहतो मात्र ही बैल त्याच्यासोबत असे काही करते की पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
एका नदीच्या काठावर एक बैल उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या शिंगात एक धागा अडकला आहे. यावेळी एक व्यक्ती ते पाहतो आणि त्या बैलाच्या मदतीसाठी पुढे जातो. तो धागा अगदी सहजतेने काढतो आणि दूर फेकतो मात्र यानंतर बैल लगेच व्यक्तीवर जोरदार हल्ला चढवते.
Mere saath toh glt hi ho jaata hai pic.twitter.com/2vMqzmZVn8
— Dude (@Memes4Grind) February 4, 2025
व्यक्तीने बैलाच्या शरीरावरुन धागा काढून फेकताच बैल मागे फिरून बघतो आणि व्यक्तीला आपल्या शिंगांनी पकडून हवेत झेलत थेट जमिनीवर आढळतो. यामुळे व्यक्ती बाजूच्या तलावात जाऊन पडतो. यांनतर बैल तिथून पळून जातो. आता आपण केलेले चांगले नेहमीच आपल्यासाठी सकारात्मक ठरलेच असे नाही याचे उदाहरण आपल्याला या घटनेतून पाहायला मिळते.
हा व्हायरल व्हिडिओ @Memes4Grind नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘काही चांगले करायला गेलो तर माझ्यासोबतच वाईट घडते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ लाखो युजर्सने पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जास्त चांगले नाही केले पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जनावर तर जनावर आहे मदत करा पण काळजी घ्या”.
हेही वाचा :
‘सनम तेरी कसम’ अभिनेत्री मावरा होकेनने केले लग्न
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा
सावधान! मोबाईलच्या अतिवापराने होऊ शकते ‘ही’ गंभीर समस्या