भाजपच्या ‘या’ मंत्र्यानी शिवकाळातील सरसेनापतीच्या कुटुंबातील महिलेला पाठवले विवस्त्र फोटो!

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीतील अन्य मंत्र्यांवरही(targeted) विरोधकांनी निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा धक्कादायक दावा राऊतांनी केला आहे. या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

जयकुमार गोरे यांच्यावर काय आरोप? :
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, गोरे यांनी एका प्रतिष्ठित घराण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवले. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील असल्याचे राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ही महिला (targeted) लवकरच विधानभवनाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला. “महायुतीतील मंत्र्यांची वर्तनशैली संशयास्पद आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, आता माणिकराव कोकाटेंचाही होणार का? मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची फेरतपासणी केली पाहिजे,” असे ते म्हणाले.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दिवशीच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांना कडक इशारा दिला होता. मंत्र्यांनी सार्वजनिक वर्तनावर नियंत्रण ठेवावे, चुकीचे वर्तन केल्यास मंत्रिपद धोक्यात येईल, अशा स्पष्ट सूचना फडणवीस यांनी(targeted) दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहेत.
या प्रकरणावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप कितपत सत्य आहेत, याबाबत तपास होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे महायुती सरकारसाठी नवा पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार
कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!
बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….