‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये(Television industry) आपल्या कलात्मक कौशल्याने ओळख निर्माण करणारे आर्ट डायरेक्टर सुमित मिश्रा यांचे निधन झाल्याने चित्रपट व टेलिव्हिजन जगतात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमित मिश्रा यांनी ‘मधुबाला’, ‘नागिन 3’ सारख्या लोकप्रिय मालिकांसाठी आर्ट डायरेक्शन केलं होतं. सुमित यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर, त्यांचे चाहते आणि सहकारी यांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सुमित मिश्रा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचा संशय निर्माण होत आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, सुमित मिश्रा हे आर्थिक समस्यांचा सामना करत होते. कोरोना व्हायरसनंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये(Television industry) झालेल्या मंदगती व कामाच्या कमतरतेमुळे त्यांची आर्थिक स्थिती बिघडली होती. या समस्यांमुळे त्यांच्यावर मानसिक ताणही वाढला होता, असं म्हटलं जात आहे.
‘मधुबाला’, ‘नागिन 3’, ‘कुमकुम भाग्य’ सारख्या मालिकांसाठी सुमित मिश्रा यांनी आर्ट डायरेक्शन केलं होते. त्यांच्या कलात्मक कौशल्यामुळे या मालिकांना एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यांचे काम अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले होते. सुमित मिश्रा यांच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्री व चाहत्यांनी दुख व्यक्त केलं आहे. अनेकजण त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर भर देत आहेत.
या घटनेने आर्थिक समस्यांमुळे होणाऱ्या मानसिक ताणाच्या गंभीरतेची जाणीव करून दिली आहे. सुमित मिश्रा हे मूळचे बिहारचे होते. बनारस हिंदू विद्यापीठाचे ते जुने विद्यार्थी होते. सुमित यांनी ‘अमृता अँड आय’ या सिनेमातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. 2020 मध्ये त्यांनी ‘खिडकी’ हा सिनेमा तयार केला. त्यानंतर 2022 मध्ये ‘अगम’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी हळूहळू कला दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सुमित मिश्रा म्हणाले की, मल्टी-टास्कर म्हणून मला काम करायला आवडतं. एकाच वेळी मी बरीच कामं करु शकतो. जवळपास अडीच दशकापूर्वी मी मुंबईत कामानिमित्त आलो होतो. सुरुवातीला मी बरेच आर्ट एक्झिबिशन लावले. नंतर प्रॉडक्शन डिझायनिंगमध्ये कामाच्या संधीची वाट पाहिली. माझं साहित्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच लिखाणाकडे मी आपोआप आकर्षित झालो.
हेही वाचा :
गौतमी पाटील चक्क पुण्याच्या पुस्तक महोत्सवामध्ये
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी
राज्यात लवकरच अत्याधुनिक कारागृहे उभारणार : मुख्यमंत्र्यांची माहिती
मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले; एकनाथ शिदेंची तुफान फटकेबाजी