भारतात आली 8 लाखांहून कमी किंमतीची ‘ही’ सर्वात स्वस्त SUV कार

देशातली आतापर्यंतची सर्वात पहिली आणि स्वस्त एसयूव्ही कुपे कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च(suv) झाली आहे. 8 लाखांहून कमी किमतीत कार उपलब्ध असून आता टाटासह महिंद्राच्या एसयूव्ही कारला सीट्रोन ही एसयूव्ही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. कार घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत 11001 रुपये देऊन ही कार बुक करता येणार आहे.

आपल्या दारात कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न. कमी खर्चात (suv)चांगली एसयूव्ही कार मिळाली तर कोणत्याही भारतीयाला हे सर्वोत्तम डील असतं. सर्वसामान्यांची पसंती टाटा सारख्या एसयूव्ही ला असताना आता सिट्रोनची एसयूव्ही कुपे भारतीय बाजारात आल्याने भारतीयांना कार खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत ही कार येणार असल्याचं सांगितलं होतं.

दिसायला अतिशय आकर्षक असणाऱ्या या एसयूव्हीमध्ये 16 इंच डायमंड कटसह ॲलॉय चाकांसह अनेक सुविधा मिळतात. मॅट फिनिश असणारी ही suv कार टाटा कर्व एसयूव्ही सारखीच आहे. उत्तम लेग स्पेस आणि 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील आहे.

सिट्रोन बेसाल्टसह सी थ्री एअर क्रॉसची अंडरपिनिंग यात देण्यात आली आहे. पोलर व्हाईट , स्टील ग्रे , प्लॅटिनम ग्रे , गारनेट रेड आणि कॉस्मो ब्ल्यू या पाच रंगांमध्ये ही कार उपलब्ध करण्यात आलीय. उत्तम डिझाईनिंग असलेल्या कार मध्ये 10.25 इंचाचा सेंट्रल टच स्क्रीन, सात इंचाचा फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 15 व्हॉट वायरलेस फोन चार्जर अशी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.

कंपनीने या कारला 7.99 लाख रुपयात एक्स शोरूम किमतीसह सादर केलंय. पण ही किंमत फक्त त्याच गाड्यांसाठी राहणार ज्यांची डिलिव्हरी 31 डिसेंबर 2024 पर्यंत असेल. 31 डिसेंबर नंतर या कारची किंमत वाढू शकते. सध्या टाटा, महिंद्रा आणि ह्यु्ंडाईच्या एसयुव्ही कारच्या किमती सर्वात कमी असताना सिट्रॉनच्या कुपे एसयुव्हीच्या किमती काहीशा कमी आहेत.

या कारमध्ये 40 हून अधिक ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सुरक्षेच्या सोयी देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. कार मध्ये ऍडव्हान्स उच्च स्ट्रेंथ असणाऱ्या स्टीलचा वापर करण्यात आलाय. याशिवाय कार मध्ये सहा एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्टंट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम यासह अनेक फीचर्सचा समावेश आहे.

हेही वाचा:

अजित पवारांच्या जीवाला धोका; गुप्तवार्ता विभागाचा अलर्ट

स्मशानभूमीत चक्क 400 मृतदेहांची विक्री, मृतदेह विकत घेण्यासाठी डॉक्टरने दिले अडीच लाख

सावधान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुसळधार बरसणार