“या नेत्यानी मुलाच्या लग्नाचा खर्च सरकारी तिजोरीतून केला” ठाकरेंच्या आरोपावर प्रतिउत्तर

राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले आहेत. कारण 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर राजकीय(political) नेत्यांच्या सभा देखील पार पडत आहेत. या सभांमधून वारंवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच रविवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटण येथील सभेत बोलताना शंभूराज देसाई यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र त्यांच्या टीकेला आता शंभूराज देसाई यांनी प्रतित्तर दिल आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, शंभूराज देसाई यांनी मुलाच्या लग्नाचा खर्च हा सरकारी तिजोरीतून केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे(political) यांनी केला होता. दरम्यान आता या आरोपांवर शंभूराज देसाई यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी शंभूराज देसाई म्हणले की, मी यासंदर्भातील सर्व चौकशीला सामोरे जायला तयार आहे. कारण राजकीय भाषणाला येताना कुणी कुणाच्या मुलाच्या लग्नात कुठून खर्च केला. तसेच इतक्या वैयक्तिक पातळीवरून जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे टीका करतील अशी अपेक्षा मला कधीच नव्हती. परंतु उद्धव ठाकरे हे स्वत:ला सुसंस्कृत नेते समजतात, मात्र त्यांनी अशाप्रकारची टीका करणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

याशिवाय उद्धव ठाकरेंकडे आता विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे आता पाटणच्या विकासासाठी त्यांच्याकडे योजना आहे का? मात्र या गोष्टी त्यांनी न सांगता त्यांनी माझ्या मुलाचं लग्न काढलं. तसेच ते मला लुटमार मंत्री म्हणाले. याचा अर्थ त्यांच्याकडे पक्षाचं धोरण तसेच मतदारसंघाच्या विकासाचं धोरण नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाची बाब म्हणजे मुळात आम्हाला जे जनतेचं समर्थन मिळते आहे, ते बघून आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका केली जाते आहे, असे देखील शंभूराज देसाई ते म्हणाले आहेत.

हेही वाचा :

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी आहे की नाही?

“माझा भांग वाकडा करू शकेल, असा कुणी पृथ्वीवर नाही”; भाजप खासदाराचं वक्तव्य

आज अनेक शुभ योग; ‘या’ राशींचं नशीब फळफळणार, होणार मोठा धनलाभ