महाकुंभमेळ्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान
हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्व असलेल्या महाकुंभमेळ्याला(Mahakumbh Mela) प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात फक्त देशातूनच नाही तर जगभरातीलही लोकं गंगेत स्नान करण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे १४४ वर्षांनी महाकुंभमेळ्याचा योग जुळून आलाय.
थेट पुढच्या २२ व्या शतकातच हा महाकुंभमेळा(Mahakumbh Mela) होणार आहे. त्यामुळे या कुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारतातूनच नाही तर जगभरातून साधु-संत, भाविक येत आहेत. पौष पौर्णिमा निमित्त सोमवारी पहिलं शाही स्नान पार पडलं. पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे.
प्रयागराजमध्ये सोमवारी झालेल्या महाकुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेता सौरभ चौघुलेनेही हजेरी लावली होती. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत थोडक्यात आपला अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनही देत खास व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की,
“अचानक जुना मित्र कुंभला जातोय असं सांगतो काय!!
त्याच्या ग्रुप मधला एक मेंबर कॅन्सल होतो काय!!
आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मेळाला जायचं ठरतं काय!!
निव्वळ योगायोग असे म्हणतात जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही.
असच काहीसं हे एक,
१४४ वर्षानंतर येणाऱ्या महा कुंभमेळा, असं म्हणतात तीन पिढ्या नंतर एका पिढीला हा योग मिळतो. आणि मला तो मिळाला.
देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं.
|| हर हर गंगे, हर हर महादेव ||”
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता ऐन थंडीच्या कडाक्यात नदीमध्ये शाहीस्नान करताना दिसत आहे. अंगावर उपरणं घालून अभिनेत्याने नदीमध्ये शाहीस्नान केलेलं दिसत आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचं “हर हर महादेव…” म्हणत कौतुक केलं आहे. तर काहींनी “हर हर गंगे…”, “तुम्हे वहाका बुलाया था… हर हर महादेव…” अशा कमेंट्स अभिनेत्याच्या व्हिडिओवर केल्या आहेत.
हेही वाचा :
तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा
वाल्मिक कराडसाठी महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न!
कुरुंदवाडात रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून देणाऱ्यावर कारवाई