यंदा MPSC च्या वर्षभर परीक्षाच-परीक्षा; वेळापत्रकही जाहीर, सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’
पुणे : राज्य शासनाच्या सेवेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आगामी प्रमुख परीक्षांचे(exams) वेळापत्रक जाहीर केले असून, वर्षभर परीक्षाच-परीक्षा राहणार आहे. त्यामुळे गुणवान, मेहनती व महत्त्वाकांक्षी उमेदवार तयारीला लागणार आहे.
नव्या वर्षांत 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठस्तर न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पूर्वपरीक्षा आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा नुकतीच झाली असून, 26 एप्रिल रोजी 35 संवर्गातील मुख्य परीक्षा(exams) होणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 10 मे, 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 18 मे, 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे, 2025 समावेश आहे.
तसेच दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असलेल्या परीक्षामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आदींचा समावेश आहे.
याशिवाय यावर्षभरात झालेल्या पूर्व परीक्षांच्या सर्व मुख्य परीक्षा या वर्षभरात होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अपर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबतची अधिकची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जो राज्यातील प्रशासकीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करतो. या परीक्षेद्वारे विविध गट-अ आणि गट-ब पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. MPSC परीक्षा कठीण मानली जाते आणि यशस्वी होण्यासाठी सखोल अभ्यास व चांगल्या तयारीची आवश्यकता असते. ही परीक्षा उमेदवारांच्या ज्ञान, निर्णयक्षमता, व अभ्यासाच्या सवयींची कसोटी घेणारी असते.
हेही वाचा :
पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत
हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण
थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले