पश्चिम महाराष्ट्रात महापूराचा धोका कर्नाटक सरकारच्या निर्णयाने सांगलीकर चिंतेत

कोल्हापूर आणि सांगलीला महापूराचा वेढा ज्या धरणामुळे पडतो त्या (dam)अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेत. कर्नाटक सरकारने नेमकी कोणती आडमुठी भूमिका घेतलीय आणि त्याचा पश्चिम महाराष्ट्रावर कसा परिणाम होणार? अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती निर्माण होते. मात्र आता कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची तब्बल 5 ऊंची वाढवण्यासाठी कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजूरी दिली आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पोटात गोळा आलाय….अलमट्टीची ऊंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगलीतील शेकडो गावं पाण्याखाली जाण्याची भीती सांगली आणिकोल्हापूरच्या नेत्यांनी व्यक्त केलीय..

बेळगावमध्ये कर्नाटकचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी अलमट्टी धरणाची ऊंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्याला (dam)मंजूरी दिली…मात्र अलमट्टीचा महाराष्ट्राला किती धोका आहे? पाहूयात….

प.महाराष्ट्राला का आहे अलमट्टीचा धोका?

– कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची 5 फूट उंची वाढवण्याचा निर्णय

– अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

– सध्याच्या उंचीमुळे 2005, 2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर, सांगलीत महापूर

– धरणाची उंची वाढल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती

– पुराखाली येणारी गावे कायमची नष्ट होण्याचा धोका

कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या भुमिकेनंतर आता कृष्णा महापूर नियंत्रण समितीने कर्नाटक सरकारला सुप्रीम कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय.. त्यामुळे कोल्हापूर (dam)सांगलीला पुराच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाला महाराष्ट्र सरकार कसं उत्तर देणार? आणि सांगली आणि कोल्हापूरला महापूरातून वाचवण्यासाठी काय उपाय शोधणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

थरकाप उडवणारी घटना; १५ वर्षीय मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरले