तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, VIDEO

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये तीन मजली इमारत(building) कोसळून एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाळी एकाच कुटुंबातील १५ जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एसडीआरएफ, एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. या घटनेमध्ये आतापर्यंत ९ जणांचा मृ्त्यू झाला. यामध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. गेल्या १५ तासांपासून घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मेरठच्या झाकीर कॉलनीमध्ये असलेली तीन मजली इमारत(building) कोसळली. मुसळधार पावसामुळे संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ३५ वर्षे जुनी इमारत कोसळली. यामध्ये १५ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. यामधील ९ जणांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एडीजी डीके ठाकूर यांनी सांगितले की, ही घटना सायंकाळी ५.१५ च्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखाली दबून दीड वर्षाच्या मुलीसह ९ जणांचा मृत्यू झाला. हे घर एका विधवा महिलेचे होते. जी आपल्या मुलाच्या कुटुंबासह इथे राहत होती. तीन मजली घराच्या तळमजल्यावर एक डेअरी चालवली जात होती. त्यामुळे अनेक म्हशीही ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. ही इमारत खूपच जुनी होती आणि त्याची दुरावस्था झाली होती.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, घर कोसळताच सिलेंडर फुटल्याचा मोठा आवाज आला. ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आम्ही धावलो. तत्काळ पोलिसांनाही कळवले. अरुंद गल्लीमुळे जेसीबी गल्लीत जाऊ शकत नव्हता.

अग्निशमन दलाच्या पथकाने हातानेच बचावकार्य सुरू केले. दोन तासांनंतर एनडीआरएफ-एसडीआरएफची टीम मशीन्स घेऊन आल्या. यानंतर वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले. ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर ९ जणांचा मृत्यू झाला. एक जण अजूनही ढिगाऱ्याखाली आहे.

हेही वाचा:

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ 5 राशींना लाभच लाभ मिळणार!

आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनय सोडणार?

जेव्हा महेंद्रसिंग धोनी संतापतो, बाटलीवर लाथ मारुन दूर उडवलं; CSK च्या स्टार खेळाडूने केलं उघड

अनंत चतुदर्शीला पाऊस विश्रांती घेणार? ‘या’ जिल्ह्यांत मात्र सोमवारपासून मुसळधार बरसणार