आज गजकेसरी योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

आज रविवार, 29 डिसेंबरला चंद्र वृश्चिक राशीनंतर(zodiac) धनु राशीत जाणार असून, चंद्रावर गुरूच्या सप्तमात असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी असून या तिथीला शिवरात्रीचं व्रत पाळलं जातं. मासिक शिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि ज्येष्ठ नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ
वृषभ राशीच्या (zodiac)लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज आराम वाटेल आणि त्यांच्या समस्याही कमी होतील, ज्यामुळे ते रिलॅक्स मूडमध्ये असतील. आज तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्याही पार पाडाल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल, एखाद्या खास व्यक्तीशी तुमची ओळख वाढू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना आज रविवारच्या सुट्टीचा लाभ मिळेल आणि भरघोस नफा मिळेल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. जोडीदारासोबत सुरू असलेले भांडणही आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मित्रांसोबत नवीन वर्षाचे नियोजन कराल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज भावांच्या मदतीने घरातील कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि ते स्वतःसाठी ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकतात. आज तुम्हाला तुमच्या वडिलांसोबत काही सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. आज व्यापारी नववर्षासंदर्भात काही योजना बनवतील, ज्याचा त्यांना फायदा होईल. रविवारच्या सुट्टीमुळे सर्व सभासद घरीच उपस्थित राहिल्याने हशा-मस्तीचे वातावरण असेल.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज कन्या राशीचे लोक असंख्य मार्गाने संपत्ती कमवू शकतात. स्वतःचं घर आणि वाहन खरेदी करण्याची त्यांची इच्छा देखील पूर्ण होईल. रविवारच्या सुट्टीमुळे घरात लहान मुलांचा खूप गोंगाट होईल आणि नवनवीन पदार्थांचा आस्वादही घेता येईल. जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर आज ही चिंता देखील दूर होईल आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. आज व्यावसायिकांना एक किंवा अधिक व्यवसाय करण्याची संधी मिळेल, ज्यातून त्यांना चांगला नफा मिळू शकेल. आज तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना दिसाल, ज्यामुळे तुमचं मनही शांत राहील.

कुंभ
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही केलेल्या कामामुळे समाजात तुमचा मानही वाढेल. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल, जो आर्थिक समस्यांना तोंड देण्यास मदत करेल. लव्ह लाईफमधील लोक आज उत्साहाने भरलेले दिसतील. आज व्यावसायिक व्यवहारानिमित्त प्रवासाला जाऊ शकतात, हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत नवीन वर्षाचं काही नियोजन कराल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील.

मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज एक नवीन चैतन्य मिळेल, ज्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही नातेवाईकांच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते, जिथे तुम्हाला अनेक खास लोक भेटतील. जर तुम्ही एखाद्याच्या सल्ल्याने पैसे गुंतवले तर त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. आज तुम्हाला मुलांकडून काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. भावांसोबत काही वाद चालू असतील तर तेही आज मिटतील.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

अजित पवार यांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या मैदानात

तरुणांसाठी बेरोजगार भत्ता योजना सुरू करणार? केंद्र सरकारने दिले ‘असे’ उत्तर

Online मागवायचे आहे किराणा सामान, ‘हे’ क्रेडिट कार्ड करेल 10 टक्के बचत