आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
आज 30 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. अमावस्या सोमवारी रात्री 3 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील. तसेच, आज सोमवारी रात्री 8 वाजून 32 मिनिटांपर्यंत वृद्धी योग(astrology) जुळून येईल. तर राहू काळ पहाटे 7 वाजता सुरु होऊन सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे.
याशिवाय आज सोमवती अमावस्या आहे. ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असून या दिवशी महादेव यांची पूजा केली जाते. तर, आजचा दिवस कोणत्या राशीसाठी(astrology) कसा जाईल, ते पाहुयात.
मेष:- आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात निर्माण झालेल्या शंका आज दूर होतील. मन हलके आणि प्रसन्न वाटेल. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज दूर होतील.
वृषभ:- नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. वाहन खरेदीचा आज योग आहे. शैक्षणिक संस्थाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या समस्या देखील दूर होतील.
मिथुन:- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. आज तुम्हाला सरकारी योजनेचे देखील पैसे मिळतील. तुम्हाला आज व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे.
कर्क:- आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. तुमच्यावर आज भगवान शिव प्रसन्न राहतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आजचा दिवस आनंदी जाईल. प्रेयसीसोबत आनंदी वेळ व्यतीत कराल.
सिंह:- एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. तुम्हाला आज अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. दिवसाच्या शेवटी आनंदी वार्ता ऐकायला मिळेल.
हेही वाचा :
शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात
टाटा समूहाची रोजगारासाठी मोठी योजना, 5 वर्षात 5 लाख उत्पादन नोकऱ्या निर्माण होतील
पोलीस कर्मचाऱ्याने सासरच्यांवर केला गोळीबार; पत्नीचा जागीच मृत्यू, सासू आणि मेहुणा ठार