निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

महाराष्ट्र विधानसभेची(political updates) निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडणार आहे. उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना रोखणं आणि निवडणुकीला सामोरं जाणं हे दोहोंपुढचं मोठं आव्हान आहे. तसंच मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी या सगळ्यांचा परिणाम कसा होतो ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या(political updates) तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तिकिट कापल्याने नाराजी असल्याचं पाहण्यास मिळतं आहे. काँग्रेसमध्येही असाच सूर आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी समंदर लौटके आयेगा और सबको साथ लेकर आयेगाची घोषणा दिली आहे. तर महाविकास आघाडीने महायुती सरकार उलथवण्याचा दावा केला आहे.

हेही वाचा :

शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात

अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान ब्रेकअपची केली कबुली

लिलावाआधी RCBच्या गळाला लागला मोठा मासा, थेट होणार संघाचा नवा कर्णधार?