महाविकास आघाडीचे आज जोडो मारो आंदोलन; सीएम शिंदेचा विरोधकांना थेट इशारा
मुंबई: एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात(latest political news) आज दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत जोडे मारून आंदोलन करण्यात येणार आहेत. या आंदोलनाला ‘सरकारला जोडे मारा’ असे नाव देण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही योग्य वेळी विरोधकांना जोडे दाखवणार असल्याचा पलटवार केला आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा(latest political news) पुतळा कोसळ्याच्या विरोधात महाविकास आघाडी आघाडीच्या नेत्यांनी आज म्हणजेच (1 सप्टेंबर) निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
या संदर्भात आज शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नेते हुतात्मा चौकातून मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर माफी मागितली आहे.
पण या मुद्द्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला आहे. “राज्य सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करते. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात जाणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. आमच्या योजनेत अडथळे आणणाऱ्यांना योग्य वेळी जोडे दाखवले जातील. त्यांना विचारा, तुम्हाला आमची योजना का थांबवायची आहे, तुम्हाला आमची योजना का बदनाम करायची आहे, तुम्ही आमच्या योजनेविरुद्ध कोर्टात का जात आहात, असे सवालही त्यांनी विरोधकांना विचारले आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये नौदल दिनी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 35 फूट उंच पुतळा 26 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी कोसळला. त्याचवेळी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत लवकरच शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची ग्वाही दिली.
तसेच, विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, कारण शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर ते काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
सकाळी नाश्त्यात १० मिनिटांत बनवा मेदू वडे: सोपी रेसिपी
“माझ्या पराभवाने खचणार नाही, विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी” – संजयकाका पाटील