आज धनत्रयोदशी, देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन-सुखाचा वर्षाव!

आज 29 ऑक्टोबररोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी (astrology)मंगळवारी सकाळी 10 वाजून 32 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. आज राहू काळ दुपारी 3 वाजता सुरु होईल ते संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. तसेच आज धनत्रयोदशीही साजरी केली जाईल. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सोने, चांदी, भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. तर आज कोणत्या राशीवर(astrology) देवी लक्ष्मी धन, सुख, समृद्धीचा वर्षाव करणार, ते पाहुयात.

मेष रास : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न राहील. आज नशीबाची चांगली साथ मिळेल. आज शुभवार्ता ऐकायला मिळेल. तुमच्या व्यवसायात भरभराट येईल.

वृषभ रास : या राशीच्या लोकांना आज लक्ष्मीच्या कृपेने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही इतरांकडून सहजपणे कामं करून घेऊ शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्याविषयी चर्चा कराल आणि एकत्र तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक कराल.

कन्या रास : तुम्हाला रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. आज तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते. त्यामुळे झटपट निर्णय घ्या.

तूळ रास : या राशीच्या लोकांवर आज लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात भरभरून यश मिळेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल.

मकर रास : आज तुम्हाला आर्थक लाभ होईल. खेळामध्ये कुशल असणाऱ्याला मोठी संधी मिळेल. आजचा दिवस कलागुणांना वाव देणारा असेल. आज तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. घरात देखील प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि समजूतदारपणाची भावना राहील.

कुंभ रास : बचत केलेल्या पैशातून आज तुम्ही महत्वाची गोष्ट खरेदी कराल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला जवळची मैत्रीण भेटेल. आज अचानक मोठा धनलाभ होण्याची देखील संभावना आहे. तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.

हेही वाचा :

महायुती की महाविकास आघाडी, महाराष्ट्रात कोणाची सत्ता?

कांद्याची वाढतीये आवक; काही दिवसांपासून दर स्थिर, आता दिवाळीनंतर…

उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!