आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!

आज 23 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे(daily horoscope). षष्ठी तिथी सोमवारी दुपारी 1 वाजून 51 मिनिटांपर्यंत राहील. तसेच रात्री 3 वाजून 10 मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. राहू काळ पहाटे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल. आज षष्ठी तिथीचे श्राद्ध केले जाईल. आज सोमवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार, त्याचे राशीभविष्य पाहुयात.

दैनिक राशिफळ(daily horoscope) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते

मेष रास : आज तुमच्यावर भगवान शंकराची कृपा असेल. तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल. आज तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.

वृषभ रास : नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल. खूप दिवसांपासून नियोजित केलेले काम आज पूर्ण होईल. आज तुम्ही वाहन खरेदी कराल. पत्नीसाठी महागडी वस्तु खरेदी कराल.

मिथुन रास : योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. आज मन प्रसन्न राहील. जास्त चिडचिड करू नका. आज जवळचा प्रवास योग आहे.

कर्क रास : तुम्ही उधार दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

सिंह रास : कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. घरात आज वातावरण आनंदी आणि शांत राहील. महिलांसाठी आजचा दिवस जास्त धावपळीचा असेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास : महादेवाची आज तुमच्यावर कृपा राहील. आज तुम्हाला आवडीप्रमाणे विवाहस्थळ येतील. विवाहाचा योग जुळून येईल. आवडत्या व्यक्तीसोबत आज तुमचा सुसंवाद होईल, यामुळे तुमच्यातील गैरसमज दूर होतील.

हेही वाचा:

इचलकरंजीत पाण्यासाठी नागरी हक्क आंदोलन

भोसरी आणि चिंचवड मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा; भाजपसह शीतयुद्धाची शक्यता

धुळे: मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाचा शुभारंभ