आज ते पप्पी घेत आहेत ठाकरे कुणाचेच नाहीत गुलाबराव पाटील खोचक टीका
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-376-1024x576.png)
महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (addition practice)महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात नसणार आहे. त्यातच आता ठाकरे गटाने भाजपशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा सारा खटाटोप सुरू आहे, अशी टीका करतानाच पण ठाकरे कुणाचेच नाहीत, असा सल्लाही गुलाबराव पाटली यांनी भाजपला दिला आहे.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-356-853x1024.png)
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना तू राहतो का मी राहतो, असं म्हटलंय आज तेच ठाकरे त्यांची पप्पी घेत आहेत. आज ते स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी जात आहेत. (addition practice)आता ते काँग्रेसशी फारकत घेत आहेत. राष्ट्रवादीशी फारकत घेत आहेत. काही राष्ट्रवादीचे नेते नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात डबडं वाजणार आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
विचारधारा सोडून काही लोक आमच्यापासून दूर गेले. आम्ही भगव्या झेंड्यासाठी फडणवीस यांच्यासोबत आलो. आता ते लोक पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडा विचार फडणवीस यांनी करावा. जेव्हा आपली गरज होती, जेव्हा आपला पक्ष अडचणीत होता, जेव्हा मोदींचं सरकार येण्यासाठी आपण (addition practice) प्रयत्न करत होतो, तेव्हा हे लोक कोणासोबत होते? आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत, तुमच्याशी गोड बोलत आहेत. पण हे कुणाचेच नाहीत.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/01/image-372-1024x1024.png)
याचा निश्चितपणे विचार करावा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांना दिला आहे.आपण आपली मूळ विचारधारा सोडली होती हे त्यांना आता कळायला लागलं आहे. पण जो बूंद से गयी वो हौद से नही आने वाली. ज्यांनी भगवा सोडला, त्यांनी पुन्हा भगवा पकडला की हात थरथरतात हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला
हेही वाचा :
‘मी फक्त हिंदू मतावरच निवडून आलो,’ नितेश राणेंचे मोठे विधान!
विराट-अनुष्काचा प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत, अनुष्काने विचारलेले सवाल आणि महाराजांचे उत्तर
‘आय लव्ह यू’ असा मेल केला, रिप्लाय न मिळाल्यावर शिवाली परबनं सांगितले जबरी चाहत्यांचे किस्से
VIDEO: केन विल्यमसनचा षटकार दर्शकाचा झेल आणि 90 लाखांची लॉटरी