कोल्हापूर हादरलं! शिळा केक खाल्ल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू,
कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव इथल्या सख्या बहीण भावांचा विषबाधेमुळे (birthday cake)मृत्यू झाल्याची माहिती आहे. श्रीयांश रणजीत आंगज वय वर्ष ५ आणि काव्य रणजीत आंगज वय वर्ष ८ अशी दोघांची नावे आहेत. फ्रिजमध्ये ठेवलेला केक खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दोघांनी फ्रिजमध्ये ठेवलेला केक खाल्ला होता. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. या घटनेमुळे चिमगाव परिसरात शोकाकुल वातावरण पसरलेला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव या गावी रणजीत आंगज त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत होते.
दोन दिवसांपूर्वी ५ वर्षीय श्रेयांश आणि त्यांची ८ वर्षीय मुलगी काव्य या दोघांनी फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा केक खाल्ल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. शिळा केक खाल्ल्याने श्रीयांश आणि काव्य या दोघांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणू लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच मुलगा श्रेयांश याला जास्त त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला तातडीने मुरगुड इथल्या एका खाजगी (birthday cake)दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, या पूर्वीच श्रेयांशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. हे कळताच आई वडिलांनी एकच आक्रोश केला. या घटनेने आंगज कुटुंबीय हादरून गेले होते.
शोकाकुल वातावरणात चिमगावमध्ये श्रेयांशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत मुलगी काव्य हिला देखील त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे सायंकाळी तिला मुरगुड इथल्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं. पण, ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तातडीने तिला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आलं. काव्यची प्रकृती अधिकच खालावली आणि सायंकाळी काव्यचीही प्राणज्योत मालावली.(birthday cake)एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती कळताच मुरगुड पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.
हेही वाचा :
शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही!
‘माझ्या मुलाला सोडा’; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये
इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच
‘मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली…’ हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य