उत्तराखंडमध्ये अडकले कोल्हापूरचे पर्यटक मदतीसाठी आर्त हाक
उत्तराखंडच्या जोशीमठजवळ ७ जुलै रोजी दरड कोसळल्याने (tourists)बद्रीनाथ-जोशीमठ महामार्गावरील वाहतूक गेल्या ५ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे, त्यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बद्रीनाथ-जोशीमठ महामार्गावर वाहनांच्या तब्बल १० किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
कोल्हापूरमधील अनेक पर्यटकांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अडकलेल्या पर्यटकांना स्थानिक प्रशासनाकडून मदत पुरवली जात आहे. (tourists)आर्मीकडून या पर्यटकांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये आलेल्या पावसाने कहर केला असून, सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव श्री. बद्रीनाथ आणि पांडुकेश्वर बॅरियरवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांनी प्रवास करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचे आणि खबरदारीचे आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत, अडकलेल्या(tourists) पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. स्थानिक प्रशासन आणि आर्मी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या पर्यटकांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
ही वाचा :
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, पहा तुमच्या शहरातील दर
जुलैमध्ये ‘या’ 4 राशींवर अचानक पैशांची बरसात