कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला; ८ जण वाहून गेले

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सगळीकडे पूरस्थिती(tractor) निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच शिरोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.

या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय(tractor). वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. शिरोळ तालुक्यातील बस्तवड गावालाही चौहेबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अशातच गावाला होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. या ट्रॅक्टरमधून ८ जण प्रवास करीत होते. त्याचवेळी बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले.

यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही ५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय. सध्या बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहे. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा:

लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

विराट कोहलीनंतर आता रोहित शर्माही भारत सोडणार?

लग्नाच्या पहिल्या दिवशी घरी येताच वधू-वराने शेअर केला Kissing Video!