TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिले आदेश, लवकरच स्वस्त रिचार्ज प्लॅन्सचे दिवस सुरु होणार!

मागील काही काळापासून टेलिकॉम क्षेत्रात बरेच बदल घडून आले. यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, टॅरिफ हाईक! जवजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी एकाचवेळी(recharge) रिचार्जच्या किमतीत 25% पर्यंत वाढ केली, ज्यामुळे बहुतेक युजर्स हे बीएसएनएलकडे वळले.

युजर्स बऱ्याच काळापासून हे वाढलेले (recharge)रिचार्ज प्लॅन्स कमी होण्याच्या प्रतीक्षेत होते त्यातच आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. तुम्हीही Jio, Airtel, Voda किंवा BSNL युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

स्वस्त रिचार्जची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. वास्तविक ट्रायने नवा आदेश दिला होता. असे म्हटले जात होते की, युजर्ससाठी असे प्लॅन्स आणण्याची तयारी केली जात आहे ज्यामध्ये यूजर्सना फक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस मिळतील. म्हणजेच यामध्ये यूजर्सना डेटा पॅक दिले जाणार नाहीत.

टेलिकॉम कंपन्यांनी असा प्लान आणावा, ज्यामध्ये फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा दिली जावी, असे ट्रायकडून सांगण्यात आले. या प्लॅनला टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला असला तरी सध्या यावर काहीही बोललेले नाही.

TRAI ने म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्यांनी (Jio, Airtel, Vodafone-Idea, BSNL) अशा योजना आणण्याचा विचार करावा ज्यांच्या किंमती कमी आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएस उपलब्ध असले पाहिजेत. यामुळे 2 सिम कार्ड वापरणाऱ्या युजर्सना मदत होईल, असे ट्रायने म्हटले होते. या सर्व सुविधा युजर्सना दुसऱ्या सिमकार्डमध्ये देण्यात आल्या आहेत. हे सर्व फीचर्स युजर्ससाठी खूप फायदेशीर आहेत. शिवाय त्यांची किंमतही खूप कमी आहे. हेच कारण आहे की, याची युजर्सना खूप मदत मिळते.

ट्रायच्या आदेशात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर बदल झाला नाही तर टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त रिचार्ज आणावा लागेल. एकदा स्वस्त रिचार्ज झाल्यानंतर, ते वापरकर्त्यांवर अवलंबून असेल की त्यांना विविध सुविधांचा लाभ घ्यायचा आहे की फक्त विद्यमान योजना खरेदी करायची आहे.

सध्याच्या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा प्लान खरेदी करावा लागतो आणि त्यासोबत यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जाते. यामुळेच टेलिकॉम कंपन्यांनी असे प्लॅन आणल्यास ते विद्यमान धोरणाच्या विरोधात असेल, असे म्हटले आहे.

हेही वाचा :

आज गजकेसरी योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Viral Video: भररस्त्यात ७-८ तरुणींचा जोरदार राडा, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले!

बूम बूम बुमराह… मारला विकेटचा चौकार, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता