ट्रायने मोबाईल रिचार्ज संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय!

आजकाल लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच नागरिक स्मार्टफोन वापरात आहेत. त्यामुळे सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनचे दर (mobile recharge) मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. अशातच आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने टॅरिफ नियमांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता मोबाईल सेवा कंपन्यांना इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी कॉलिंग आणि एसएमएससाठी नवीन रिचार्ज प्लॅन आणवे लागणार आहेत.

ट्रायने केलेल्या या बदलामुळे मोबाईल नेटवर्क सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना किमान एक विशेष टॅरिफ व्हाऊचर कॉलिंग आणि एसएमएससाठी प्लॅन जारी करावा लागणार आहे. तसेच त्या रिचार्ज प्लॅनची(mobile recharge) वैधता देखील 365 दिवसांची असावी लागणार आहे. त्यामुळे ट्रायच्या या निर्णायाचा फायदा जे यूजर्स इंटरनेटचा वापर करत नाहीत, आणि केवळ फोन कॉलिंग आणि एसएमएसचा वापर करतात यांना होणार आहे.

याशिवाय मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना किमान 10 रुपयांपासून रिचार्ज पॅक जारी करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायने मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांना कितीही दराचे रिचार्ज व्हाऊचर जारी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या याबाबतीत निर्णय घेतील.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा हा आदेश येत्या 30 दिवसांमध्ये लागू होणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच मोबाईल कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅनसह आणखी रिचार्ज प्लॅन देखील लाँच करावे लागणार आहेत. तसेच त्यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन असणार आहेत.

याशिवाय ज्या युजर्सला डेटा वापरायचा नाही अशा ग्राहकांना मात्र या बदलाचा सर्वात मोठा फायदा होईल. तसेच फीचर फोन यूजर्स, 2G सीमचे यूजर्स यांना देखील या निर्णयाचा फायदा होईल. तसेच ट्रायच्या या निर्णयाने देशभरातील 15 कोटी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :

थंडीत पाऊसधारा! राज्यातील ‘या’ भागात जोरदार बरसणार

सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी बीट पनीर कबाब

प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…