कोल्हापूर ते मुंबई प्रवास आता फक्त 45 मिनिटांत; ‘स्टार एअर’ देणार विमानसेवा
सर्वसामान्यांना सुलभ हवाई प्रवासाची अनुभूती देण्यासाठी एक उल्लेखनीय पाऊल म्हणून, भारत सरकारने ‘उडान’ ही ‘प्रादेशिक जोडणी योजना’ (आरसीएस) सुरू केली, ज्याद्वारे 60 लाख प्रवाशांना स्वस्त दरात विमान (Travel)प्रवास करता आला आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेला पाठिंबा दर्शवत ‘संजय घोडावत ग्रुप’च्या ‘स्टार एअर’ (Travel)या विमान वाहतूक उपक्रमाने केवळ दोन वर्षांत कोल्हापूर-मुंबई मार्गावर ५४ हजारहून अधिक प्रवाशांना हवाई प्रवास घडवून प्रादेशिक जोडणीमध्ये एक नवीन मापदंड स्थापन केला आहे.
‘स्टार एअर’च्या यशाचा हा टप्पा सर्वसामान्यांचा हवाई प्रवास सुलभ करण्यासाठीची वचनबद्धता अधोरेखित करते. कोल्हापूर-मुंबईच्या प्रत्येक विमानातील २० ते २५ आसनांचे सरासरी तिकीट दर सुमारे २ हजार ८०० रुपये इतके आहे.
आतापर्यंत २७ हजार १५७ हून अधिक प्रवाशांनी या परवडणाऱ्या तिकीट दराचा लाभ घेतला. यामुळे परवडणारा आणि सर्वसमावेशक हवाई प्रवासाचा पर्याय प्रदान करण्याच्या ‘स्टार एअर’च्या उद्दिष्टाला बळकटी मिळाली आहे. कोल्हापूर ते मुंबई विमान प्रवासाला अवघे ४५ मिनिटे आणि मुंबई ते कोल्हापूर प्रवासाला एक तास लागतो, यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होत आहे.
हा टप्पा केवळ कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानच्या हवाई प्रवासाची वाढती मागणीच दर्शवत नाही, तर प्रादेशिक जोडणीला चालना देण्यासाठी, हवाई प्रवासाची सुगमता (पोहोच) वाढवण्यासाठी आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीस हातभार लावण्यासाठी ‘स्टार एअर’ची वचनबद्धताही दर्शवते.
सर्वसामान्यांच्या हवाई प्रवासाच्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून ‘स्टार एअर’ने स्पर्धात्मक तिकीट दर कायम ठेवत टियर-२ आणि टियर-३ शहरे जोडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-मुंबई मार्गाच्या (कॉरिडॉर) पलीकडे विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तसेच आगामी काही वर्षांत कोल्हापूरला नवीन प्रदेशांशी जोडण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.
‘स्टार एअर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅप्टन सिमरन सिंग तिवाना म्हणाले की, ”स्टार एअरमधून सर्वांचा हवाई प्रवास सुलभ, स्वस्त आणि आनंददायी व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. कोल्हापूरला मुंबई, अहमदाबाद आणि तिरुपति आदी भागांना जोडून आम्ही प्रवाशांच्या केवळ वेळेचीच बचत करत नाही, तर त्यांना प्रवासाची अनोखी अनुभूती, प्रवासाची पद्धतही बदलत आहोत. आगाऊ बुकिंग केल्यास आमच्या विमान प्रवासाचे तिकीट दर बहुतेक वेळा बसच्या तिकिटांसारखेच असते’.
कोल्हापूरने प्रवास आणि जोडणीच्या बाबतीत दीर्घकाळापासून विविध आव्हानांचा सामना केला आहे. यामुळे कोल्हापूरच्या विकासात अडथळा येत होता. आता आणखी चार शहरांमध्ये प्रवासी वाहतूक जोडून जाळे विस्तारित करण्याच्या योजनेसह; व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी नवीन मार्ग उघडण्याचे स्टार एअरचे लक्ष्य आहे, ज्यामुळे कोल्हापूरची वाढ आणि विकास होईल.
तसेच सुधारित हवाई जोडणीसह, शहराचे धोरणात्मक लोकसंख्याशास्त्र, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मजबूत कृषी क्षेत्राबद्दल माहिती मिळवता येऊ शकते, ज्यामुळे पर्यटन आणि राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे प्रवेश करता येऊ शकतो.
हेही वाचा :
ते दोघे आले, मिरची पूड डोळ्यात टाकली अन्…; खळबळजनक प्रकार
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे हॉल तिकीट…
अमोल कोल्हेंचा टोला: “शिवसेना झोपेतून उठायला तयार नाही, तर काँग्रेस…