‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ ७५ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार; ३७ नवीन दवाखाने सुरू करण्याची घोषणा

मुंबई: ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत ७५ लाखांहून अधिक रुग्णांवर (patients)आतापर्यंत उपचार करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांना मोफत आणि तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन केलेले हे दवाखाने आता आणखी विस्तारणार आहेत.

महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच मुंबई आणि उपनगरांमध्ये ३७ नवीन दवाखाने सुरू होणार आहेत. यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी आरोग्यसेवा मिळेल. दवाखान्यात विविध आजारांची मोफत तपासणी आणि औषधोपचार केले जातात, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

या योजनेंतर्गत नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यापासून तपासण्या आणि आवश्यक औषधोपचारपर्यंत सर्व सेवा विनामूल्य दिल्या जातात. मुंबईकरांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला असून, सरकार आणखी विस्तार करण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा:

Lexus ने तब्बल 2 कोटींच्या ‘या’ लक्झरी कारची बुकिंग अचानक थांबवली

इचलकरंजी महानगरपालिकेतील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

जिओ, Vi, एअरटेलला दरवाढ भोवली, लाखो युजर्सनी सेवा सोडली