ट्यूशन टीचर की हैवान? शाळकरी मुलीसोबत केले अश्लील कृत्य

पुणे : राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दररोज अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालक तरुणावर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिकवणी चालक तरुणावर(teacher) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण(teacher) खासगी शिकवणी घेतो. पीडित मुलगी त्याच्याकडे शिकवणीसाठी जायची. आरोपी तिला अश्लील चित्रफीत दाखवायचा. तू जर अभ्यास करताना चुकली तर तुला शिक्षा देईल, असे सांगून तिच्याशी अश्लील कृत्य करायचा. घाबरलेल्या मुलीने याची माहिती आईला नुकतीच दिली.

नंतर आईने पोलिसांकडे तक्रार दिली. गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे वय २५ वर्ष असून, त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करत आहेत.

कोंढवा भागातील एका शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. कर्वेनगर भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांशी नृत्यशिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी नृत्यशिक्षकासह संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली होती. शहरात अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

हेही वाचा :

फोर टायर केक, मित्रांसोबत दिली पोझ…. सलमान खानच्या बर्थडेचा Inside Video

भारताविरुद्ध रचला जातोय मोठा कट? 250 किलो RDX आणि 100 AK47 पाकच्या….

‘ये जवानी है दिवानी’ पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल, निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून जाहीर केली डेट!